Homeमुक्त- व्यासपीठसमाजाशी गद्दारी

समाजाशी गद्दारी

आपल्या आजूबाजूला,समोर मागे पुढे, बरोबर गद्दार लोक आहेतच की उथळ माथ्याने फिरणारे.माईचाच पदर ईकुण जल्लोषात जिंदगाणीच गाण गाणारे.
ओळखता यायला पाहिजे खड्या सारखे बाजूला सारता आले पाहिजे हे गद्दार लोक.
तरच सत्याला प्रतीष्टेला निष्ठेला किंमत येईल.
कोणीतरी अपार कष्ट करून प्रचंड जिवाच्या आकांताने एखाद्या कार्यांत झोकून देऊन कसलाही स्वार्थ न बघता समाजाचं तळमळीने काम करतो ना . अशा गद्दारांमुळे त्याच्या इमाणदारीवर ही विस्वास ठेवत नाही समाज. ईथे त्यांचाच जास्त कोंडमारा होत असतो.
कोणतेही महत्कार्य एकट्याने होतंच नाही त्याला चार दहा पाच पन्नास जनांची साथ हवीच असतें मनापासून.मात्र त्याच चार दहा पाच पन्नासात दोन चार गद्दार घुसले की निपजले की मेहनतीचं मणसुब्याचे मातेरे होते.
कारण त्याच पहिल्या फळीतील चार दहा जणांकडे त्यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी लाखों करोडो हात तयारच असतात काही ना काही देण्यासाठी.ज्याना पुढारीपण नको असतें.
मात्र चार दोन गद्दारांच्या वयक्तीक महत्वाकांक्षेने लाखो करोडोंचे मणसुबे धुळीला मिळतं असतात.
मात्र ह्यांना काय फरक पडणार. मड्याच्या टाळुवरचे लोणी खाणार्ऱ्या ह्या अवलादी चमकोगिरी तर अशी करतात की जणू हेंच लाखों करोडोंचे तारणहार.म्हणतात ना नकटीच्या नाकालाच जास्त खाज असते. मात्र नकटी ती नकटीच.
ह्या नकट्यानां गळाला लावणारे . चांगल्या मोठ्या कार्याला खोडा घालुन नासवणारे शिकारी वर टपलेले लांडगे या काळात तर लयच बोकाळलेत तेही एकदा ठेवायलाच पाहिजे.

जगन्नाथ काकडे
मेसखेडा

***पोस्ट सध्याच्या राजकीय परीस्थिती वर नसुन. मराठा क्रांती मोर्चा मध्ये घुसलेल्या गद्दारा संदर्भाने आहे. व्हायरल होत असलेली एॅडीओ क्लीप.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular