आजरा (अमित गुरव ) – सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रची आजरा तालुक्याची कार्यकारणी जाहीर झाली . गेले 4 वर्षांपासुन सरपंच संघटना तालुक्यामध्ये कार्यरत असून संघटनेच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच, सदस्य पर्यायाने प्रत्येक ग्रामपंचायतीचे प्रश्न अडचणी सोडवण्याचे काम करत आहे असे संघटनेचे जिल्हाकार्याध्यक्ष संभाजीराव सरदेसाई यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले. राज्यकार्यकारनि सदस्य राजू पोतनीस यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा व पार्श्वभूमी विषयी माहिती दिली. मराठा महासंघाचे अध्यक्ष मारुती मोरे सर यांनी तालुका कार्यकारणी घोषित केली.
सण २०२१ सालासाठी आजरा तालुका कार्यकारणी.
१. संतोष बेलवाडे, वडकशिवाले सरपंच, अध्यक्ष
२. शिवाजीराव नांदवडेकर, वाटंगी सरपंच, कार्याध्यक्ष
३. सुनील देसाई, देवकांडगाव सरपंच, उपाध्यक्ष
४. मारुती चव्हाण, चितळे सरपंच, उपाध्यक्ष
५. अमोल बांबरे, आरदाळ उपसरपंच, सचिव
६. आकाराम देसाई, सरोळी सरपंच, सहसचिव
७. जी. एम. पाटील, देवर्डे सरपंच, खजिनदार
८.सचिन उत्तुरकर , उत्तुर उपसरपंच, सदस्य
९. रघुनाथ सावंत , जाधेवाडी उपसरपंच, सदस्य
१०. सुरेश खोत, बहिरेवाडी सदस्य, सदस्य
११. लहू पाटील, दर्डेवाडी उपसरपंच, सदस्य
१२. मनोहर जगदाळे, कोवडे सरपंच, सदस्य
महिला कार्यकारणी
१. मनीषा देसाई, वेळवट्टी सरपंच, अध्यक्षा
२. लता रेडकर, पेड्रेवाडी सरपंच, कार्याध्यक्षा
३. उषा जाधव, पेरणोली सरपंच, उपाध्यक्षा
४. पूनम गुरव, खानापूर सरपंच, सचिव
५. बनाताई शिंदे, हाल्लेवाडी सरपंच, सहसचिव
६. प्रियांका आजगेकर, होनेवाडी सरपंच, खजिनदार
७. गीता सुतार, विटे सरपंच, सदस्या
८. वैशाली गुरव, हरपवडे सरपंच, सदस्या
९) स्वाती आजगेकर, खोराटवाडी सरपंच, सदस्या
सल्लागार मंडळ
१. दीपक देसाई, मडीलगे, मा सरपंच , सल्लागार
२. ऍड लक्ष्मण गुडुळकर, मेंढोली सरपंच, सल्लागार
यावेळी ऍड लक्ष्मण गुडूळकर यांनी स्वागत केले. मनीषा देसाई , जी एम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष संतोष बेलवाडे यांनी संघटनेचे महत्व अधोरेखित करून आभार मांडले.
मुख्यसंपादक
Congratulations Di😍😍