Homeमुक्त- व्यासपीठसविधांनाची खाण(तेच आमचे भीमराव)

सविधांनाची खाण(तेच आमचे भीमराव)

घडवला ज्यांनी इतिहास
लावले त्यांना दोष
थांबले नाही कधीच
तेच आमचे भीमराव

लोकांसाठी झटले
न्यायासाठी झगडले
हक्कासाठी भांडले
तेच आमचे भीमराव

आमच्या जीवनाचा
केला ज्याने उद्धार
जगण्यास दिला अर्थ
तेच आमचे भीमराव

न्यायाचा हक्क दिला
शिक्षणाचा आधार दिला
नोकरीची संधी दिली
तेच आमचे भीमराव

पुस्तकाचा छंद दिला
लिखाणाचा धडा दिला
सविधांनची खाण दिली
तेच आमचे भीमराव

अन्यायावर करून मात
जगण्या शिकवले आम्हास
तेच आमचे भीमराव

✍️जागृती नाईक ( भाईंदर )
दिनांक – २५ नोव्हेंबर/२०२२

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular