संविधान संविधान सविधान संविधान !
कधी घेतले का समजून संविधान ?
कधी वाचले आहे का संविधान ?
हातात घेवून एकदा डोळ्यांनी वाचून,
जेव्हा डोक्यात घ्याल तेव्हा कळेल संविधान !!
देश घडवण्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा
रक्तवर्ण सळसळणारा विचार आहे संविधान !!
हक्काने कर्तव्याची जाणीव करून देणारे,
दबलेला आवाज बाहेर पडून जाब विचारणाऱ्या,
कष्ट, मेहनतीने झिजलेल्या शरीराचे आहे संविधान !!
समान न्यायाची धारणा, सोशितांचे हुंकार
प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे संविधान !!
समाज जोडण्यापासून, शिक्षणाचे महत्त्व मांडणारे
समतेच्या उंबरठ्यावर सर्वधर्म समभाव जपणारे
बंधुता आणि न्यायाची मिसाल आहे संविधान !!
जननायक, क्रांतीसुर्य, महामानव, विश्वरत्न
यांनी मांडलेल्या विचारांचा ग्रंथ म्हणजे संविधान !!
राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायालय ज्याच्या अधीन आहे
त्या महाग्रंथाचे नाव संविधान आहे
देश रक्षणाचे वस्त्र, देशाभिमानाचे शस्त्र, अस्त्र आहे
संविधान !! संविधान !! संविधान !!
✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर- आण्णा
मु. पो. रुण, ( पराडकर वाडी )
ता. लांजा, जि. रत्नागिरी
समन्वयक – पालघर जिल्हा
खुप सुंदर रचना,
खरंच एकदा वाचावे संविधान 🙏
मस्त !! खूप छान वर्णन विजय सर!
[…] समजून घ्यायला हवे संविधान अमित गुरव […]
खुप छान .