ज्ञानदानाच्या या पवित्र क्षेत्रात...
तुम्ही आणली रे ती
सी.एच.बी नावाची रांड
ती नांदते अगदीच सुखाने
आमच्याच प्रपंच्याचा करुनी घात…
शिक्षकाचे दोन प्रकार
एक अनुदानित खेळतो तुपाशी…
तर दुसरा विनाअनुदानित
राहतो उपाशी…
शिक्षण व्यवस्थेचा तुम्ही मांडला हो
असा बाजार…
आम्ही नेट-सेट,एम.फिल,पीएच.डी,पात्रताधारक
अन् अनुभवी असूनही
स्वीकारतो अगदीच लाचारीने
सी.एच.बी नावाच्या रांडेचा आधार…
उद्याचे नागरिक घडविता घडविता
कधी सांभाळावी लागते
संस्थाचालकांची मनमानी…
तर कधी वरिष्ठांची मर्जी
करिते अपमानी…
या रांडेला कंटाळून
कोणी आत्महत्या करतो…
तर कोणी उद्याच्या
सुखद आशेवरच जगतो…
आता हाकला रे
या शिक्षण व्यवस्थेतून ती सी.एच.बी नावाची रांड
करितो आम्ही पुन्हा एकदा
हात जोडूनी ही लाचार विनवणी…
पाहू नका रे तुम्ही आता आमचाही अंत
नाहीतर,तुमच्याच विरोधात पेटतील उद्याच्या मशाली
आमच्याच पोटातल्या आगीतूनी….!
- संदीप देविदास पगारे
खानगाव थडी ( नांदूर मधमेश्वर-नाशिक )

मुख्यसंपादक
[…] सी.एच.बी नावाची रांड…! […]
[…] सी.एच.बी नावाची रांड…! […]
[…] सी.एच.बी नावाची रांड…! […]
[…] सी.एच.बी नावाची रांड…! […]