Homeघडामोडीसोसायटी निवडणूक रणधुमाळी

सोसायटी निवडणूक रणधुमाळी

आजरा ( अमित गुरव ) -: सोसायटी निवडणूक रणधुमाळी सद्या गावागावात चर्चेचा विषय ठरत आहे. पूर्वी कधी सोसायटी निवडणूक लागली आणि ती संपली हे मोजक्याच लोकांना समजत होते पण आज त्यातील राजकारण कळत – नकळत पणे ग्रामस्थ आणि सभासदांच्या सामोरे येत आहे ; अशी सर्वसाधारण चर्चा होते.


आम्हाला विश्वासात कधी घेतलेच नाही , 4 -2 नवीन चेहऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली असती तर आज निवडणूक बिनविरोध होऊन गावात जल्लोष केला असता… ह्यांना इतक्या शीट का आणि कश्या देऊ ? आता ह्यांना माझी आठवण झाली का ? मी नाराज आहे ह्याची जाणीव करून देणे गरजेचे होते , मला संचालक बनून मलई खाण्याची इच्छा नव्हती पण अस्तिव सिद्ध करता आले असते , अश्या नानाविध चर्चेना उधाण आले आहे .
सभासदांना निवणुकी बाबत नेमके काय वाटते ? आपण फोन किंवा ई- मेल च्या साह्याने आम्हाला अभिप्राय कळवू शकता तुमच्या आग्रहास्तव नाव लिंक मराठी मार्फत गुप्त ठेवले जाईल.

मोबाईल- 8421666667
ई-मेल – Info@Linkmarathi.com

क्रमशः

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular