अबँकस हे गणिताशी संबंधित काहीतरी आहे इतकेच आपल्याला माहीत असते . पण आज आपन त्याचे पूर्ण नाव , उपयोग , अशी संपूर्ण माहिती घेऊया. आणि गणितासोबत मैत्री करूया.
अबँकस हे पूर्ण शब्द किंवा नाव म्हणून ही ओळखतात. पण काही ठिकाणी याला
A – Abundant (भरपूर )
B – Beads (मणी )
A- Addition and ( बेरीज )
C – Calculation (मोजणी )
U – Utility (साधन )
S – System (पद्धती )
या पूर्ण शब्दाने मानले जाते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास अबँकस म्हणजे “मण्याची पाटी “. ज्यामुळे जलद व अचूक गणिते सोडवता येतात ; ठराविक सूत्रांचा वापर करून . अबँकस शब्दाचा उगम ग्रीक , लॅटिन यानंतर इंग्रजी असा भाषिक प्रवास झाला .
उगमस्थान-: अंदाजे २००० वर्षांपूर्वी याचा उगम झाला असे म्हंटले जाते पण तसा कोणताही ठोस पुरावा कोणत्याही देशात आढळत नाही तरीही चीन , जपान, मध्ये याचा प्रचार व प्रसार झाला.
http://linkmarathi.com/मानसिक-आरोग्य-म्हणजे-काय/
भारत प्रवेश- आजअंती सर्वच देशांनी अबँकस चे महत्त्व मान्य केले असून भारतात ३० वर्षापासून प्रामुख्याने सुरवात झाली. तरीही भारतीय गुराखी जेव्हा आपली गुरे जंगलात जाताना झाडावर रेषा मारत आणि घरी येताना त्या मिटवत हे पाहून बाहेरील देशातील लोकांनी त्यावर अभ्यास करून अबँकस ची निर्मिती केली असे काही ठिकाणी बोलले जाते.
शोधाचे कारण – व्यवहारातील गणिते जलद गतीने करण्यासाठी यांचा शोध लागला.
अबँकस चे प्रकार – १)जपानी पद्धती – ही पद्धत सुलभ व सोप्पी आहे. सर्वदेश याच पद्धतीचा अवलंब करतात.
२) चायनीज पद्धत- फक्त चीन हा एकमेव देश या पद्धतीचा वापर करतो .
तंत्रज्ञान आजही उपयुक्त – चीन , जपान , मधील बँकेतील कर्मचारी , व्यापारी किंवा उद्योजक लोक कॅल्युलेटर न वापरता आजही अबँकस डिव्हाईस वापरतात.
फायदे – गणिताची आवड निर्माण होते. एकाग्रता वाढते , स्मरणशक्ती वाढते, आकलनशक्ती वाढते, बौद्धिक श्रमतेत वाढ होते, आत्मविश्वास वाढतो, जलद वाचन व लिखाण होते. योग्य सरावाने १० मिनिटांत १०० गणिते करता येतात.
http://linkmarathi.com/ट्रेन-train-च्या-मागे-x-हे-चिन्ह/
वय- वय वर्ष ५ ते १४ या वयोगटातील पाल्य अबँकस शिकू शकते. काही ठिकाणी इंगजी सोबतच मराठीतून ही शिकवला जात असलेला जागतिक मान्यता प्राप्त ट्रेनिंग प्रोग्रॅम .
संकलन – अमित अशोक गुरव ( आजरा , कोल्हापूर )
मुख्यसंपादक
Nice
Nice
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]