Homeमुक्त- व्यासपीठहृदयविकाराचा झटका……

हृदयविकाराचा झटका……

सध्या हृदयविकाराचा झटक्या ने मृत्युमुखी पडलेल्यांची आणि पडत असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .
हृदयविकारानंतर जगभरात जास्त मृत्यू पहिल्या एक दोन तासांत योग्य उपचार वेळेत न मिळाल्याने होतात. त्यात चुकीचा सल्ला देणारे असतात. हृदयविकाराचा झटका आल्यास सबंधित व्यक्तीला त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे व त्या दरम्यान प्रथमोपचार मिळणे हे अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यामुळे बरेच पेशंटचे प्राण वाचू शकतात.

एखाद्या व्यक्तीच्या छातीत अचानक दुखणे व काही वेळातच पुन्हा बरे वाटणे म्हणजे साधा त्रास आहे, असे प्रत्येक वेळेस समजण्याचे कारण नाही. कधी कधी हार्ट अॅटॅक येण्यापूर्वी काही संकेत येतात. पण आता बरे वाटते असे सांगत ती व्यक्ती घरी डॉक्टरला बोलावण्यास नकार देते. अशी लक्षणे असल्यास त्या व्यक्तीला एकटे सोडू नये. त्वरित अॅस्परिनची गोळी चावून गिळून टाकण्यास सांगावे. अगदी थोडेसे पाणी द्यावे. ज्यूस, सरबत, कोलड्रींक किंवा खाण्यास काहीही देऊ नये. यापुढील उपचार घरात होत नाहीत. त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे. पेशंटला घाम येऊन कपडे ओले झाले असतील तर त्याचा अर्थ रक्तदाब कमी झाला आहे. या परिस्थितीत हाताची नाडी व्यवस्थित लागत नसेल तर सॉबीट्रेट ही गोळी देऊ नये. कारण या गोळीने रक्तदाब कमी होतो व जास्त हानी होते. ही गोळी दिल्यावर एकदम बरे वाटले तर संकट टळले असाही अर्थ काढू नये. पेशंटला जवळच्या हॉस्पिटलमध्ये न्यावे. सुरुवातीच्या ६० ते ९० मिनिटात उपचार न मिळाल्यास पेशंटचे खूप नुकसान होते.

हृदयविकार म्हणजे काय ?
हृदय शरिराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या असे म्हणतात.
जर अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही व ती व्यक्ती मरण पावते . ह्यालाच हृदयविकार म्हणतात.
हृदयविकार का होतो ?
आपण जसजसे मोठे होत जातो, शरिराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्त वाहिन्यांमध्ये आतून कोलेस्ट्रॉलचे थर साठू लागतात, ज्यात कोरोनरी आर्टरीचा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात.

महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकाराचे जास्त प्रमाण आढळते. सामान्यत: महिला सेक्स हार्मोन इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमूळे सुरक्षित आहेत. ह्याचा प्रभाव कमीतकमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो.
भारतीयांसहित अनेक आशियाई विकासनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो.
ज्यात खालील कारणांचा समावेश आहे :
धूम्रपान करणे
मधूमेह
उच्च रक्तदाब
लठ्ठपणा
उच्च कोलेस्ट्रॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्ट्रॉल
शारिरीक श्रमाची कमतरता
अनुवंशिकता
तणाव, रागीटपणा आणि चिंता
वंशानुगत मुद्दे

लक्षणे
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असतात. काही लोकांमध्ये किरकोळ लक्षणे असतात; इतरांना गंभीर लक्षणे दिसतात आणि काहींना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत

डॉक्टरांना कधी भेटायचे?
जर एखाद्या व्यक्तीला छातीत दुखणे, श्वास लागणे किंवा मळमळ किंवा थंड घाम येणे यासारखी इतर लक्षणे असतील तर त्याने ताबडतोब आपत्कालीन विभागात जावे. लक्षणे गंभीर असल्यास, डॉक्टर रुग्णाला हृदयरोग तज्ज्ञ किंवा हृदयरोग तज्ज्ञांकडे पाठवू शकतात.

हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णास काय प्रथमोपचार द्यावे ?
हृदयविकारावर झटकन ऊपचार मिळाल्यास जीवन वाचवता येते.
जोपर्यंत वैद्यकिय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे.
जर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरीत ऑक्सिजन द्यावे.
जर नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरबिटरेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरीत त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी.
पाण्यात ढवळून अँस्प्रीन द्यावे.

हृदयविकारावर काय उपचार असतात ?
हृदयविकारावर झटकन वैद्यकिय उपचार व इस्पितळात भरती करणे गरजेचे असते.
पहिले काही मिनीटे आणि तास जरा संकटपूर्ण असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधे दिली जातात.
हृदयाच्या स्पंदनांवर लक्ष ठेवले जाते व जर काही अनपेक्षीत स्पंदने आढळली तर त्यावर ऊपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधे दिली जातात व रुग्णास आराम करण्यास व झोपण्यास सांगितले जाते. जर रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात.
प्रत्येक रुग्णाची व त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचे नुकसान आणि अडथळ्यांचे प्रमाण व रुग्णाचे वय लक्षात घेऊन ऊपचार पद्धती ठरवली जाते.
कितेक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. ह्यात कोरोनरी एंजियोप्लास्टी, फुग्याने वाहिकांचा अडथळा दूर करणे किंवा कोरोनरी बाईपास सर्जरीचा ऊपयोग केला जातो.

हृदयविकाराचे निदान
सामान्यतः, आरोग्य सेवा प्रदात्याने नियमित तपासणी दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरणाऱ्या जोखीम घटकांसाठी रुग्णांची तपासणी केली पाहिजे.
हृदयविकाराच्या झटक्याचे निदान आपत्कालीन कक्षात वारंवार केले जाते. तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला असेल किंवा येत असेल तर वैद्यकीय कर्मचारी परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी त्वरीत कार्य करतील. व्यक्तींना त्यांच्या लक्षणांबद्दल आणि वैद्यकीय इतिहासाबद्दल विचारले जाऊ शकते.
रक्तदाब, नाडी आणि तापमान यांचे निरीक्षण करून हृदयविकाराचे निदान केले जाते. हृदय कसे धडधडत आहे हे निर्धारित करण्यासाठी आणि संपूर्ण हृदयाच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी चाचण्या केल्या जातात.

हृदयविकारापासून ज्यांना धोका आहे त्यांनी खालील नियम पाळावेत :

चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला हृदयाशी संबंधित अनेक समस्या उद्भवत असतात. वेळीच अशी काही लक्षणे आपल्याला जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.तुमच्यापैकी कोणालाही हृदयाशी संबंधित समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता आपण तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
जीवन शैलीत परिवर्तन:
धूम्रपान करु नये व करत असल्यास त्वरित बंद करावे.
वजन जास्त असणा-यांनी वजन कमी करावे.
आहार स्वस्थ ठेवा ज्यात चरबी आणि मिठ कमी असावे, फाइबर आणि जटिल कार्बोहाइड्रेट उच्च मात्रेत असावे.
शारिरीक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे.
योगाभ्यास चालू ठेवा.
मेडीटेशन करा.
मधूमेह, रक्तदाब किंवा जास्त कॅलेस्ट्रोल असणा-यांनी त्यांची रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगास अटोक्यात ठेवावे.

सौ . रुपाली स्वप्नील शिंदे
भादवन (ता. आजरा )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular