Homeमुक्त- व्यासपीठहे माणसा माझे Photo घेऊ नको; मी संस्कृती नाही , ती संस्कृती...

हे माणसा माझे Photo घेऊ नको; मी संस्कृती नाही , ती संस्कृती आहे…

तशी ती बाई जपान ची , जवळपास नव्वद हजार खर्च करून हजारो किलोमीटर वरून भारतातील लेण्या पाहण्यासाठी मुंबई ला आली . खाजगी बसने अजिंठा वेरूळला पोहचते. सोबत एक हाय रेजुुलेशन कॅमेरा, मॅप, एक आठवडा लेण्यांचा अभ्यास, एक प्रश्नांची यादी ,
अजिंठा वेरूळला येऊन खूप बारकाईने अभ्यास करतात .काही दगडमातीचे नमुने सोबत घेतात लेणी, पहाड, दगडाचे फोटो काढतात. बनवण्याची प्रक्रिया समजुन घेतात. कलाकृतीचे निरिक्षण करतात .
आणि ज्यावेळेेस जपानची बाई लेण्याचे फोटो काढत असते . त्यावेळेस भारतातील मुलं त्या बाईचे फोटो काढ़त असतात. ही बाब त्या बाईला खटकते ती बाई त्या मुलांना समजावून सागते. he u man,don’t capture, I am not culture
(लेण्याकडे बोट दाखवत )
this is culture, u take their photos

पन तरी ते 25,30 वर्षाचे मुलं एेकत नाहीत. आणि म्हणतात मॅम वन फोटो यु एंड मी ………
ती बाई कंटाळुन… ठीक आहे म्हणते आणि मुलं त्या बाईच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढतात .
हे असले प्रकार वेरूळ, गोवा भारतात बर्‍याच ठिकाणी घडतात.
मग ती बाई जपानला जाऊन तिथल्या लोकाना माहिती देते की, भारतातील कैलास मंदिर जगातलं एकमेव असं मंदीर आहे की जे वरून खाली बांधत आणलेले आहे ,लोणार सरोवर जगातलं उल्कापातानं तयार झालेले एकमेव सरोवर आहे, गोव्याला आंतराष्ट्रीय दर्जाचा समुद्रकिनारा आहे. आणि असं बरच काही,

आणि आपल्या भारतातील मुलं घरी येऊन बाकीच्यांना सांगतात की, काय फॉरेनर होते ? हा बघ फोटो हा ईथला हा तिथला फोटू, एखादा लेण्याजवळचा फेसबुकला टाकलेला फोटू पाहुन मित्र कमेंट करतो, bro u looking hero फक्त दिसत नाही ते हजारो वर्षापूर्वी तयार झालेली आजच्या इंजीनीअर ला लाजवेल अशी कलाकृती. हा कलाकृतीचा अप्रतिम नमुना जो आपल्या देशाची शान असतो आणि ज़िथे जाउन आपल्यातील काही नमुने दीलच्या पानात A for apple आणी B for ball लिहुन येतात.
त्या मूर्खांना कलाकृतीबद्दल माहिती काय असणार?

कारण इथे इतिहास हा विषय बोरींग समजला जातो, मराठी मध्ये MA करणार्‍यांना साधी कविता करता येत नाही, आणि आयुष्य AC मध्ये जाणारे ज्यांच्या पायाला माती लागत नाही,ते लोक शेतीवर आणी बिसलरी चे पाणी पिणारे लोक दूष्काळावर शोधनिबंध लिहित आहेत.
100 रूपयात दिवसभर काम करणारा घाम गाळतो आणि दिवसाला खूर्चिवर बसुन हजारो कमावणारे AC ची मागणी करत आहेत.

सौजन्य – सो. मिडिया

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular