पोरी काळ कसा बदलतो ते बघ, आजची लोकं कुणालाही डोक्यावर घेतील आणि कुणाच्याही पायावर डोके ठेवतील.
तो मोठ्या लांब गाडीतून उतरला आणि सरळ जाऊन मंडळाच्या नियोजनाप्रमाणे घटस्थापनेच्या पहिल्या आरतीचा मान घेतला.
आरती झाली आणि तो गाडीतून आला तसा निघून गेला.
कोपऱ्यात उभ्या असलेल्या आजींनी थरथरत्या हातांनी देवीला नमस्कार करत देविलाच प्रश्न केला.
माते! कोण सज्जन आणि कोण अत्याचारी हे तुलाही दिसत नाही का ?
✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर – आण्णा
( विरार )
समन्वयक – पालघर जिल्हा