सैाख्यदायीनी वरदायीनी आई जगदंबे,
शरण तुला मी आलो माते आई जगदंबे.१
संसाराची दुःख सारी तव चरणी मी वाहीली,
अमृत सरीता आनंदाची तव चरणी मी पाहीली.२
संकट पडता भक्तांवरी तू धावूनी येशी आई ,
तव आशिर्वादाने जीवन अवघे उजळीतसे आई.३
नवरात्रीचा जागर ग माये भक्तांनी मांडीला ,
प्रसन्न तू ग व्हावे म्हणूनी माये गोंधळ घातला.४
साडेतीन शक्तीपीठांनी मराठी भूमीशी वसशीं ,
छत्रपती शिवरायांनाही वर स्वराज्यासाठी देशी.५
चूकभूल ती क्षमा करूनी आई पदराशी तू घेई ,
जीवनपथावरी चालताना , वर यशाचा तू देई.६
नवरात्रीच्या शुभ पर्वात माझी भक्तीमय रचना आई जगदंबेच्या चरणी मनोभावे समर्पित करीत आहे.
कवी रेवाशांकर वाघ ठाणे
मुख्यसंपादक