आदरणीय आण्णांच्या काळातील विठ्ठल कारख्यान्याची वैशिष्ट्य –
1)-5 कोटी 35 लाखाला कारखाना तयार केला. (त्यावेळी कारखाना तयार करण्यासाठी 8-9 कोटी तरी किमान लागत असत, इथं आण्णांची काटकसर लक्ष्यात येते)
2)-त्यावेळी इतर कारख्यानाच्या तुलनेत 200 रुपये टनाला बील जास्त मिळत असतं.
3)-महाराष्ट्राच्या प्रथम पाच क्रमांकाच्यामध्ये विठ्ठल कायम ठेवण्याची भुमिका आण्णांनी कायम यशस्वी करून दाखवली.
4)- त्याकाळात ऊस गेला नसताताही दिवाळीला 50-50 हजार व्याज बील मिळत होते.
5)-ऊस लागण केल्यापासून पुढे शेतकऱ्यांना कधीही अॅडव्हान्स मिळत असे.
6)- कामगारांच्या पगारीला कधीच १ तारिख ओलांडू दिली नाही.(तुलनेत आज कामगारांची काय आवस्था झालीय)
7) – शेतकऱ्यांना फक्त विठ्ठल कारखान्याच्या हमीपत्रावर बॅकेतून सहज कर्ज उपलब्ध होत असे..
8) महाराष्ट्रात त्या काळात कोणीही नवीन कारखाना काढायला लागला तर विठ्ठल पॅटर्न प्रमाणे काढू हा विचार करत.
9)अनेक राष्ट्रीयीकृत बँकाचे मॅनेजर आण्णांना आमच्या बॅंकेत ठेवी ठेवा,आमच्या बॅंकेचे कर्ज घ्या, शेतकऱ्यांना कर्जासाठी आमची बॅक सुचवा म्हणून लोटांगण घालतं.. गरज पडली तर आम्ही तुम्हाला कमीशन देतो इथपर्यंत मॅनेजर आण्णांना विनंती करत… पण आण्णांनी कमीशन तर खुप लांबची गोष्ट झाली विठ्ठल चाही एकही रुपया घेण्याचं पाप केल या देवमाणसाने केले नाही….
या देवमाणसाचा सभासद कधी विचार करणार आहे का नाही…????
आज काय आवस्था झालीय आण्णांच्या काळातील सोन्याचा धूर निघणाऱ्या विठ्ठल ची…
मग सभासदांना अजून किती वाटोळे होणे अपेक्षित आहे… कधीतरी आपण याबाबत विचार करणार आहोत का नाही… अजून किती वाटोळे होणे बाकी आहे…???
आण्णांचा एक काळ होता मुलगी देताना विठ्ठल चा सभासद आहे का..???
असा प्रश्न आवर्जून विचारला जात होता…कारण ऊस गेला नसताताही दिवाळीला 50-50 हजार व्याज बील मिळत याचा अर्थ त्या सभासदाला एक प्रकारे महीन्याला ५ हजार रुपये पगारच मिळाल्या सारखा होता..
आँडींटला अधिकारी वर्ग आला कि आण्णा स्वताच्या खिशातील 10 रूपये कामगारला देऊन या अधिकाऱ्यांना विठ्ठलाच्या भुमीतील एक किलो साखर भेट म्हणून द्या म्हणून सांगायचे …आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट भाषेत सांगायचे तुमच्या पध्दतीने कसेही चेकिंग करा तुम्हाला फक्त आमच्या कडून 1 किलो साखर भेट म्हणून मिळेल…
अत्यंत कष्टातून तळागाळातील गोरगरिबांचा विचार करुन आण्णांनी हि संस्था उभारली आहे… पण त्याच परत काय झालं विठ्ठल कोणत्या दिशेने घेऊन गेले हे आज संबंध तालूक्याने पाहीले आहे. ते मला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही…
हि माहिती आपण लक्ष्यात घेऊन येणाऱ्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत प्रत्यक्ष आण्णांचा नातू म्हणजे आपले आताचे आण्णाच आदरणीय युवराज दादांना निवडून द्याल असं भावनिक आवाहन मी आपल्याला करतो… अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येकांने आपल्या घरातील वडीलधारे कोणीही असेल वडील, आजोबा यांना आण्णांचा काळ आणि त्यानंतरचा काळ ह्याबाबत विचारणां जर केली तर युवराज दादांना कोणताही विशेष प्रचार करण्याची अजिबात गरज उरणार नाही..
विठ्ठल कारखान्यावर प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या 45 हजार कुटूंब अवलंबून आहेत…. मतदान सभासद, नागरिक म्हणून व्हावं… नेत्यांची गाडी, कडक कपडे, बोलबच्चन भाषणशैली ला भुलू नका… आण्णांनी रक्ताचं पाणी करून आपल्या स्वताच्या कुटुंबांचा, मुलाबाळांचा विचार न करता पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या शेतकऱ्यांनाचा राजवाडा समजल्या जाणाऱ्या विठ्ठल वर आज 650 कोटी रुपये कर्ज आहे तो आकडा 1200 कोटी होऊन धुळीस मिळायला वेळ लागणार नाही… येणारा काळ आपल्या युवा पिढीपुढे अनंत अडचणी आणि अनंत आव्हान घेऊन येणार आहे… परत परत संधी येणार नाही. डोळे उघडे ठेवून आण्णांचा काळ लक्ष्यात ठेवूनच विठ्ठल ला मतदान करा आपल्या तालुक्याचे भविष्य फक्त विठ्ठल वर सर्वस्वी अवलंबून आहे..
- – सचिन महादेव शितोळे (येवती)
मुख्यसंपादक