आनंदकंद


काळीज रोज रडते , काढून दाखवू का
ते काढण्यास छाती , फाडून दाखवू का

माझ्या तुझ्या सुखाला , दुष्काळ ग्रासताना
झाडासमान मीही , वाळून दाखवू का

गर्दी नकोय नुसती , दर्दी हवेत येथे
बाजार भावनांचा , थाटून दाखवू का

शब्दास धार आहे , ते टोचता कळाले
गझलेत वेदना मी , मांडून दाखवू का

जात्यासमान मजला , झिजणे पसंत आहे
आलीच संकटे तर , कांडून दाखवू का

खपवून घेत नाही , तो जाच मी कुणाचा
दु:खा तुझ्या घरी मी , नांदून दाखवू का

संवाद साधल्यावर , परिवार एक होतो
नात्यातला दुरावा , सांधून दाखवू का


✍️ श्री.विजय शिंदे…
३२शिराळा,सांगली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular