Homeमुक्त- व्यासपीठआपल्या जीवनात गुरुचे महत्व…

आपल्या जीवनात गुरुचे महत्व…

आपल्याला माहीतच आहे की , शाळा कॉलेज मध्ये आपल्याला शिक्षक असतात ते आपली शिकवणी घेतात. त्याचबरोबर जीवनात येणाऱ्या अडचणींना कस सामोर जायचं , जीवन कस जगायचं हे देखील शिकवत असतात . म्हणजे हे शिक्षक आपले गुरू असतात आणि ते आपल्याला घडवत असतात जस आपल्याला नदी पार करायला बोटीची गरज असते त्याच प्रकारे कोणतही काम पूर्णत्वाला न्यायचं असेल तर गुरू महत्त्वाचा आहे . गुरू नेहमीच आपल्या शिष्याना परिपक्व बनवण्याचा प्रयत्न करत असतो गुरू स्वतः वर्तमान जगत असताना शिष्याचं भविष्य घडवत असतो. तुम्हाला कोणतही काम करायचं असेल तर कुणाच्या ना कुणाच्या सल्याची गरज असते , आणि आपल्या अचूक असा सला फक्त गुरुच देऊ शकतो. कारण ते निस्वार्थ भावनेनं तुमचं हित बगत असतात .

एक गुरू कितीतरी शिष्याचं भविष्य घडवत असतो . शिष्यांमधील चांगले वाईट जाणून त्याच्यातील कलागुणांना जाऊन त्यांना स्वतःच्या पायावर निर्भय पण उभं करतात. गुरू शिष्याचं नात हे अतूट असत आपल्या जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर गुरू हा महत्वाचा घटक आहे.

  • तुकाराम गुरव (आजरा )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular