परिवर्तनाच्या वाटेवर निघालोत
आम्ही म्हणूनच मी लिहीणार
आहे बोलणार आहे.
व्यवस्थेच्या विरोधात
अन्याय अनिष्टरूढी
अंधश्रद्धेच्या विरोधात…
मनाला बोचणार् मनाच्या
कोलाहालात न दाबता
मांडणार आहे ओरबडनार आहे
ओरखडे समाजमणाच्या
भळभळनार्या जखमेवर …
फूकंर घालून लपून छपून
मी दाबनार नाही सत्य
तर समाजाच्या डोळ्यात
वास्तवतेच अंजन घालून
दाखवणार आहे
ते जगत असलेले भोगत
असलेल उघड नागड असत्य. ..
कारण आमच्या जातकुळीची
गाथाच तुकारामाने लिहीलीय…
गांधीच्या वाटा तुडवत फूले
शाहूचा विचार रूजूण
आमच आतंरमण प्रगल्भ झालय .
दाभोळकर कलबर्गी पानसरे
च्या मारेकऱ्यांच्या
रडारवर अजून कोण आहे
याची पर्वा कूनाला
कारण शिवरायांचा रक्ताचा वसा
आमच्या धमन्यान मधून
अजून वाहतो आहे.
- जगन्नाथ काकडे
मेसखेडा
मुख्यसंपादक