प्रतिकचे लग्न होऊन नुकतेच २- ४ महिने झाले होते. नेहमी स्मित हास्य करणारा प्रतिक आता काय बायको आली आहे घरी म्हणजे ऑफिसमधून लवकरच येत असणार असे म्हंटले की गोड हसायचा. नवदाम्पत्य दोघेही आनंदात होते. प्रतिकच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याची आई देखील सकाळ -संध्याकाळ देवाचे आभार व्यक्त करण्यासाठी देवघरात देवपूजा अथवा नामस्मरण करण्यात व्यस्त असे. आता तर ती आपल्या नटखट नातवाच तोंड पाहण्यास उत्सुक होती.
असेच दिवसागणिक दिवस जात होते . शर्मिला ला तिच्या आईची उणीव कधी भासली नाही .तिघांचे कुटुंब खूप सुखी – समाधानी जिवन जगत होते.
एके संध्याकाळी आई संध्याकाळी जपमाळ घेऊन देवघरात बसली होती . तेवढ्यात प्रतीक कामावरून आला आणि त्याच्यासोबतच मोगऱ्याचा सुगधं ही. सूनबाईच्या केसात गजरा माळला (फुलला ) असेल या विचाराने आईने गच्च डोळे मिटून घेतले होते पण तो सुवास…..
काही वेळाने जप पूर्ण झाला आणि पाहते तर काय मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत प्रतीक्षा करत होती. त्यांची कूस अजूनही सुगंधीतच होती . मात्र देवघरातील खोडकर कान्हा आईकडे पाहून गालातल्या गालात हसत होता.
- अमित गुरव ( भादवण , ता- आजरा )
मुख्यसंपादक