आठवणीत तुझ्या आजही
मी दंग आहे
बघ ना रे सख्या या ओठांना
तुझ्याच प्रेमाचा रंग आहे
सतावते ही गुलाबी थंडी
मज मिठीत तू घे ना
इश्काच्या या धुंदीत आता
तू ओठात ओठ दे ना
ढाळले रे कित्येक अश्रू
तुझ्या आठवणीतच
रात्रीची पहाट करुया
आज मिलनाच्या खुशीतच..!
- संदीप देविदास पगारे
खानगाव थडी, नांदूर मधमेश्वर-नाशिक
मुख्यसंपादक