महिलांचा सन्मान करणारी आपली संस्कृती , मुलगी जन्माला आली लक्ष्मी आली , असं म्हणणारे आपण जेव्हा आपणं आपल्या शेजारी सगेसोयरे आपल्या घरांत मुलगी जन्माला येणे. म्हणजे भाग्याचे माणल जात माझी छकुली माझी लेक भाग्याची अशी आपली मनधारणा असतें मुलीच्या जन्माचे स्वागत करा असा शासन सल्ला देत आहे. त्यासाठी माझी मुलगी भाग्याची. व मुलींच्या जन्मावर एक विशिष्ट रक्कम मुदत ठेव ठेवली जाते. एक वेळ मुलींचा जन्मदर जास्त होता पण काळ बदलला आणि लिंग चाचणी सारखी सोय आली आणि लिंग चाचणी करून मुलीचा गर्भातच घात केला जाऊ लागला. वंशाचा दिवा फक्त मुलगा असतो या समजूतीने आपल्या मनात घर केले होते. त्यांची पोचपावती म्हणून एक वेळ अशी आली की आज मुलींचा जन्मदर कमी झाला आहे. आपण विसरलो की. छत्रपती शिवाजी महाराज. शाहू महाराज. ज्योतीबा फुले. बाबासाहेब आंबेडकर. महाराणा प्रताप. समाजसेवक. क्रांतिकारी अशी विविध विभूती माणसाला जगण्याचा. राहण्याचा आपल्या जन्माचा अर्थ सांगणारे. लोकांच्या हितात आपले हित बघणारे. आपल्याला मिळाले म्हणजे त्यांना जन्माला घालणारी एक स्त्री होती हे आपण विसरतो. राजमाता जिजाऊ. झाशीची राणी लक्ष्मीबाई. फातिमा शेख सावित्रीबाई फुले. मदर तेरेसा. अशा विविध महिलांनी नावलौकिक मिळविला आहे. या सुध्दा भारतीय नारी आहेत. जर मुलगी जन्माला आली नसती तर अशा पावन विभूतीना आपण मुकलो असतो
मुलगी जन्माला आली सोबत लक्ष्मी घेऊन आली. म्हणायला बर वाटत पण खरोखरच असं होत का नाही. लक्ष्मी वाढलेली आपणांस खपते पण मुलगी वाढल तसं आपल दडपण वाढतं मग ती शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये. बाजार. प्रवास. सार्वजनिक विविध ठिकाणी. आज आपली कन्या कन्या अडचणीत आहे. कारणं आज आपण बाल लैंगिक शोषणाच्या घटना वेळोवेळी वृतमापत्रात. दूरचित्रवाणी. यांवर बघतो वाचतो आणि आरे आरे वाईट झाल एवढंच म्हणतो आणि विसरुन जातो. पण आज बाल लैंगिक शोषण करणारे हे विसरतात की त्यांना जन्माला घालणारी एक स्त्रिच आहे # पर स्त्री मातेसमान # हे सत्य आहे का ? सर्वात मोठा शाप आहे तो म्हणजे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि याच जास्त प्रमाण आहे ते म्हणजे. पुणा मुंबई या भागात बलात्काराचे प्रमाण जास्त आहे. त्यापेक्षा वाईट म्हणजे एखाद्या ठिकाणी बलात्कार घडलाच तर ती घटना दूरध्वनी दूरदर्शन यांवर ब्रेकिंग न्यूज म्हणून. पाठोपाठ दाखवून आपल्या न्युज लाइव्ह याचा टिआरपी वाढविणे एवढाच उद्देश असतो आणि बलात्कार करणार्या व्यक्तिला सारखें जनतेपुढे दाखविले जाते म्हणजे पिढता पेक्षा व्यक्तिची जाहीरात केली जाते. महाराष्ट्राला हलवून टाकणारे या घटना. काही दिवसांपूर्वी पुण्यात १३ वर्षाच्या एका चिमुकल्या मुलींवर बलात्काराची घटना घडली. ही बातमी ताजी असताना रेल्वे स्टेशन परिसरात रात्रीच्या वेळी फुटपाथवर झोपलेल्या एका सहा वर्षांच्या चिमुरड्यांवर बलात्कार झाल्याचे समोर आले. खेड तालुक्यातील एका १२ वर्षाच्या मुलींवर पाच नराधमांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केलयाची फक्त नोद आहे. वसयीत १६ वर्षाच्या मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला. पिपंरी येथे एका नराधमाने मी निवृत्त पोलिस असल्याचे सांगून एका महिला शिक्षेकेवर बलात्कार केला. अमरावती १७ वर्षाच्या मुलींवर बलात्कार झाला. मुंबई साकीनाका येथे एका महिलेवर बलात्कार झाला आणि उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला कोपरडी बलात्कार प्रकरण. ही घटना भयानक असतो आपणास त्यांच्याविरुद्ध आवाज उठविण्याचा आणि पिडीतांना न्याय मिळवून देणयाची गरज आहे त्यानुसार आपल्या संविधानाने आणि कायद्याने घटनात्मक संस्था. व्यवस्था यांच्या भूमिका स्पष्टपणे आपणास आखून दिलेल्या आहेत त्यानुसार पोलिसांची जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखणे आणि बलात्कार सारख्या प्रकरणांचा तपास. फिर्याद नोंदविणे. आरोपींना गुन्हेगारांना पकडणे. इथवरच मर्यादित आहे. गुन्हा घडला आहे किंवा नाही त्यातील आरोपींना कोणती शिक्षा झाली पाहिजे आदी गोष्टी ठरविण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला आहे बहुतेक अशा प्रकरणांमध्ये खरया गुन्हेगारांना पकडले आहे याची खात्री नसते. बरेचदा खरेखुरे आरोपी मोकाट फिरतात म्हणजे चुकीच्या लोकांना शिक्षा देऊन बलात्कार घटना थांबणार नाहीत आणि बलात्कार सारख्या घटना थांबणार नाहीत आरोपींना पकडून तुरुंगात डांबून ठेवणे त्यानंतर त्यांना जामिनावर मुक्तता करणे पैसा वशिलेबाजी. धमकी. दम. अशा माध्यमांचा वापर करणारे आरोपी यांना पोलिसांनी पकडून जनतेच्या ताब्यात द्या. म्हणजे. वाईट नजरेने बघितले तर डोळे काढा. बलात्कार असेल तर हात तोडा नाहीतर चौकात यांना फाशीची शिक्षा द्या. नाहीतर मरेपर्यंत चप्पल बूट सॅंडल यांने मारण्यात यावे यासाठी अशा आरोपींना जनतेच्या ताब्यात द्या जनता यांना शिक्षा देईल त्याशिवाय आरोपीच्या मनांत दहशत बसणार नाही कशासाठी यांना पकडायचे आणि त्यांना पोलिस स्टेशनमध्ये पोसायचे.
१९६० मध्ये गुन्हेगारी कायदा यासंबंधीची सविस्तर माहिती आपणांस देतो विविध फौजदारी कायदे काही उप कलमे लावली आहेत त्यानुसार शारीरिक मानसिक छळ इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध. ३५४ अ महिलेला विवस्त्र होण्यास भाग पाडणे. या कृतयासाठी ३५४ ब लैंगिक समाधान मिळविण्याच्या विकृती ३५४ क आणि महिलेचा पाठलाग करणे आॅनलाइन छळ ३५४ ड अशा विविध महिलांसाठी संरक्षक कलमांचा समावेश करण्यात आला आहे राज्यात बलात्काराच्या घटना वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा कठोर कायदे करण्याची मागणी जनसामान्यांच्या मनात आली होती त्यानुसार काही महिला संघटना व महिलानी मागणी केली होती त्यानुसार#दिशा # कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने शक्ति कायदा आणणारं आहे बलात्काराच्या अनेक खटल्यांमध्ये पिडिताचे शोषण होते आणि गुनहेगार मोकाट सुटतात त्यामुळे केवळ कायदाच नव्हे तर समाजाने सुध्दा आपली जबाबदारी म्हणून जिथे जिथे महिलेवर अत्याचाराची प्रकरणे घटना घडत असतील तर अशा पिडित महिलांना कायदेशीर संरक्षण द्या. बलात्कार घटना नंतर व्यक्त होणारा राग हा योग्य असला व्यक्ति त्यामुळे भावनिक होऊन किंवा केवळ दिखावा म्हणून किंवा विरोधकांकडून मागणी होतंय म्हणून निर्णय घेणे उचित ठरणार नाही. तसेच गुन्हे घडल्यानंतर प्रक्रियेविषयीचा विचार करत असताना ते घडणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कडे लक्ष दिले पाहिजे बलात्काराच्या दृष्टीने याचा विचारांत सेफ्टी संकल्पना अंमलबजावणी गरजेची आहे
महिलांचे लैंगिक शोषण बलात्कार आणि हत्या अशा गंभीर गुन्ह्यांत वाढ झाली आहे प्रश्न पडतो की अशा घटना का घडतात? एक समाज म्हणून आणि यंत्रणा म्हणून आपल्या देशाला या आघाडीवर सातत्याने अपयश का येते आहे ? महिला आणि पुरुष समान नाहीत आणि त्यामुळेच पुरुषांप्रमाणे महिला सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये. मनाप्रमाणे कपडे धारण करू नये. हसू नये. सजनेसवरणे. लैंगिक शोषण आणि बलात्कार हे एक आजारांचे लक्षण आहे असा आजार जडलेल्या व्यक्ति पुरुषांपेक्षा महिलेला कमी लेखतात. फक्त आणि फक्त भोग वस्तू म्हणून त्यांची गणना करण्यात येते हे वास्तव्य समजून घेतलं पाहिजे स्त्री भ्रूणहत्या आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमागे हीच मानसिकता असते जे लोक पितृसत्ताक मानसिक मध्ये लहानाचे मोठे होतात आणि शिक्षणाच्या अधिक संधी प्राप्त करून घेतात ते सामान्यतः असे मानतात की आपण महिलेपेक्षा श्रेष्ठ आहोत आणि त्यामुळेच आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्याचा हक्क आहे महाराष्ट्र मध्ये गेल्या ४ ते ५ हजार महिला बलात्कार घटना घडल्या आहेत तर ७/८ हजार बालकांवर अत्याचार झालेले आहेत आणि आजही होत आहेत यापुढे होणारच कारण आपली शासन व्यवस्था आणि आपली मानसिकता याला कारणीभूत आहे सार्वजनिक ठिकाणी जाणारया महिलांवर. ४००/५००/हून अधिक महिलांवर अॅसिड हल्ले झाले ग्रामीण व शहरी भागातील पुणे मुंबई उपनगर यामध्ये एक हजाराहून अधिक महिला या अत्याचाराला बळी पडल्या आहेत महिलांवर बलात्कार आणि बालकांवर लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ले आणि अन्य घरेलु अत्याचार घटना झाल्या अशा पिडीत महिलांना सुरक्षा प्रधान करण्यासाठी शासनाने # मनोधैर्य # योजना २०१३ मध्ये सुरू झाली आणि २०१८ पर्यंत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण कडे पुनर्वसनासाची जबाबदारी देण्यात आली
निरक्षरता. अठरा विश्व दारिद्र्य. गरिबी. बेरोजगारी. अश अनेक समस्या आज वेश्याव्यवसाय यासाठी महिलांना प्रवृत्त केले जाते आणि असे भयानक समस्या आपल्या देशाला भेडसावत आहेत इथली समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तितकेच मोठे परिश्रम घ्यावे लागतात. दुर्दैवाने चित्रपट किंवा अलीकडच्या माहिती तंत्रज्ञान समाजप्रवृती सदृढ करण्यापेक्षा त्यातल्या विकृतींनादेखील संरक्षण दिलयाचेच एकंदरीत दिसून येते.
नोव्हेंबर १९५३ मध्ये कांग्रेस पक्षाने आपली महिला आघाडी स्थापन केली त्यापूर्वीच १९३४ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समांतर अशा राषटसेविका समितीची स्थापना श्रीमती लक्ष्मीबाई केळकर यांनी केली होती. पूर्वीच्या जनसंघाला व आत्ताच्या भारतीय जनता पक्षाला या समितीमधून स्त्री कार्यकर्त्या मिळतातं. १९५५ मध्ये राष्ट्रीय सेवा दल व प्रजासमाजवादी पक्ष यांना जवळ असलेल्या समाजवादी विचारांच्या महिलांनी समाजवादी महिला सभेची स्थापना केली या सभेचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने महाराष्ट्रापुरते आहे ही महिल सभा आंतरराष्ट्रीय लोकशाही समाजवादी सभेशी संलग्न आहे.
– अहमद नबीलाल मुंडे
मुख्यसंपादक