Homeमुक्त- व्यासपीठकरिअर आणि बरच काही"

करिअर आणि बरच काही”

 (अनुभवाचे बोल) (भाग:- १ )

     रोजच धावपळीचं जीवन वाढत्या ताणतणावामुळे आपण स्वतःला, कुटुंबाला वेळ देत नाही. जीवन असच निघून चाललं आहे. वाढत्या कामामुळे अधिकच आपण व्यस्त होत जात आहोत. यात प्रश्न निर्माण होतात ते आपण एवढं काम करतो पण आपल्याला पगार कमी देतात..? आपली प्रगती का होत नाही..? इथ कमी शिकलेला पगार जास्त का घेतो..? कमी पगारात घर कस चालवायचं..? आपल्याला बडती का मिळत नाही..? काम सोडून देऊ का..? आपण कधी मोठे होणार..? आपला बॉस एवढं काम करून आपल्यालाच का बोलतो..? राजीनामा देऊ का..? मला जॉब भेटेल का पण नवीन...? मला जॉब का भेटत नाही..? भेटला तर मनासारखं का नाही भेटत..? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात यात काही शंकाच नाही. साहजिकच आपण मनुष्य आहोत हे प्रश्न तर पडणारच मग याच निरसन कस करायच याला पर्याय काय. काय करावा आपण हेच काही कळत नाही .

१. नोकरी का मिळत नाही..? आपल्याला कमी पगार का भेटतो..? दुसऱ्याला पगार का जास्त मिळतो..?
मुळात आताच्या पिढीच झाल अस की झटक्यात काम आणि चांगला पगार मिळायला हवा ही सर्वांची इच्छा असते. मार्केट मध्ये झालय अस की नोकऱ्या कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळं नोकरी मिळणं अवघड झाल आहे हे खर आहे पण तितकच चुकीच ही. नोकरी आहे पण आपल्याला हवी तशी नाही आपल्याला जे हवं ते मिळेलच अस नाही मित्रानो जी नोकरी मिळेल ती करा. पगार कमी का असेना सुरुवात तर करा. आपल्याला चांगली नोकरी हवी असेल तर तस शिक्षण ही असायला लागत आणि शिक्षन असेल तरी अनुभव लागतो. साधी गोष्ट आहे मित्रानो शिक्षण + अनुभव = नोकरी. म्हणजेच अनुभव हवा तो कसा मिळणार तर अनुभव तेव्हाच मिळणार जेव्हा आपण नोकरी करणार आणि नोकरी करायची असेल तर त्या साठी सुरुवात करावी लागणार. एकदा तुम्ही सुरुवात केलात तर तुमच्या ओळखी वाढणार, एकमेकांचा परिचय होणार विचारांची देवाणघेवाण होणार. आणि काम करण्याची, शिकण्याची पद्धत कळणार म्हणजेच तुम्हाला अनुभव मिळणार. त्यामुळं जे मिळेल ते काम करा. मित्रानो. काही वेळा मनात येत की माझ्यापेक्षा कमी शिकलेल्या व्यक्तीला पगार जास्त कसा त्यावेळी आपण नर्व्हस होतो. त्याच अस आहे की त्याही व्यक्तीनं कुठून तरी सुरुवात केली असणार एकतर त्याला अनुभव चांगला असणार किंवा त्याला कंपनी मध्ये खूप वर्षे झाली असणार एकाजागी टिकून राहण्याचा हा मोठा फायदा होतो. पण त्या व्यक्तीने नक्कीच कुठून तरी कमी पगारात सुरुवात केली असणार. जेव्हा त्याने त्या वेळेत तीन हजार पगाराने सुरुवात केली असेल तेव्हा कुठं आज तो चाळीस हजार पगार घेत असेल. आता अस झालं आहे की सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालू झाली आहे त्यामुळे आपण पर्मनंट होऊ शकत नाही. त्यामुळं मला तर वाटत अनुभव घ्या जेवढं नवीन शिकायला मिळतं तेवढं शिका आपली कल्पना शक्ती सुधारा. यामुळे तुम्हाला पुढे नक्की चांगला पगार मिळेल..

बॉस मला एवढं काम करून ओरडतो..?
मी नोकरी सोडू का..?
मला फॅमिलीला वेळ मिळत नाही..?
याच काम किती भारी आहे…?
माझ कस होणार…?

  प्रत्येक कंपनीत चांगली माणसं भेटतील अस नाही कोणी ना कोणी एखाद दुसरा असणार वेगळा. सगळ्यात एक गोष्ट महत्वाची म्हणजे आपण चांगल तर इतर चांगले. सर्वांशी आदराने वागत जा. जी छोटी कामे आहेत ती आधी करा. उद्याच्या कामाची लिस्ट आजच बनवा आणि तो कागद समोर लिहून ठेवा म्हणजे सकाळी येऊन तुम्हाला तुमच्या कामाची  आठवण होईल. कमी वेळात कशी काम उरकतिल ते बघा मग दुसऱ्या कामाला वेळ द्या. दुसऱ्या कामाला वेळ लागत असेल तर तोपर्यंत तिसर काम हाती घ्या. फावल्या वेळेत वर्तमानपत्र किंवा मित्रांशी गप्पा मारा थोड शांत वाटेल. काम आटपून लवकर घरी निघा आपला रोजचा इनबॉक्स कसा पूर्ण होईल यावर लक्ष द्या. आपल्याला वाटत की दुसऱ्याच काम बर आहे तो मजेत आहे. अस काही नाही मित्रानो तो तुमच्यासमोर निवांत असला तरी त्यालाही काही प्रॉब्लेम असतीलच की. त्याचीही काम आहेत, त्याच ही कुटुंब आहे कदाचित मित्रानो प्रॉब्लेम सर्वांना असतात फक्त ते दिसून येत नाहीत काहीना मोठे काहीना छोटे  त्यामुळ तुम्ही विचार सकारात्मक रहा..

मला काही तरी करायचं आहे…?
मी कस करू….?
मी विचार तर करतो पण दुसऱ्या दिवशी आहे तसच..?
मला वेळ मिळत नाही..?
मी मोठा कसा होणार..?
मला या लोकांसारख जगायचं नाही मला वेगळ काही तरी करायचं आहे पण करू कस…?
मला कही तरी वेगळं करायचं आहे. हा विचार आपल्या डोक्यात येणे हीच खूप मोठी गोष्ट आहे. मित्रानो आपल्याला असच जगायच नाही इतरांपेक्षा वेगळ काही तरी करायचं आहे हे आताच मनाशी पक करा कारण जो तुमच्यापेक्षा जास्त वर्षे कंपनीत राहून पगार जास्त घेतो हे मान्य आहे पण त्याच मरण तिथच आहे हे लक्षात घ्या. आपल तस व्हायला नको म्हणून आपण प्रयत्न करायचे. आपल्याकडे अजून वेळ आहे, वय कमी आहे त्यामुळं आपल्याकडे संधी कमी आहे आणि याच संधीच सोन करायचं हाच मोका आहे. त्यामुळं शिक्षण थांबल असेल तर पुन्हा सुरू करा, अजून काही नवीन शिकायला मिळतं का बघा. आपण आज विचार करतो उद्या होत नाही कारण आपल्या विचारांची क्षमता वाढली असते आणि क्रियाक्षमता कमी झाली असते त्यामुळं अस होत. फक्त एक गोष्ट करा सुरुवात करा लहान गोष्टी पासून एक तास, दोन तास, अर्धा तास जेवढा वेळ मिळतो त्या वेळेत सुरू करा बघा तुम्ही कसे रमत जाता. आपली इच्छाशक्ती वाढवा रोज काही तरी नवीन शिका. काम करताना हे असच का तसच का असे स्वतःला विचारा, नवीन काम घेत जा त्यामुळं नवीन शिका नवीन शिकलात तर नवीन अनुभव मिळेल यातून तुमची प्रगती होईल. मोठ तर. व्हायचं आहे मग प्रयत्न पण तसे करायला हवे मित्रानो. आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे हा विचारसुद्धा काहींच्या मनात येत नाही मोठे तेच होतात जे मनात उच्च विचारांची बांधणी करतात…

कुटुंब, शिक्षण, लग्न,
काही खेडे गावातील मुलांचं अस होत मुंबईत नवीन येतात एकतर शिक्षण चांगलं असत नाही तर शिक्षण कमी आणि जबाबदारीच ओझ जासवंदीसारखा. सामान्य माणसाचं असच आहे. ज्या वयात शिकायचं असतं त्यांना शिकायला मिळतं नाहि. काहीही होऊ देत मित्रानो पण काम करत तुमचं शिक्षण पूर्ण करा. जबाबदाऱ्या आपल्याला अजून चांगला अनुभव देतील. तुम्ही शिक्षण + नोकरी + अनुभव + जबाबदारी = सुखी माणूस. ज्यानं आजच्या काळात खूप वाईट दिवस काढले आहेत उद्या त्यालाच चांगल्या दिवसांची किंमत कळते. नोकरी सोबत तुम्ही काम करता यामुळे तुम्हाला अनुभव मिळतो एकदा का तुमचं शिक्षण पूर्ण झालं तर तुम्हाला नोकरी चांगली मिळेलच आणि नाही जरी मिळाली तरी तुम्ही वाईट काळात एवढे अनुभव घेतले असता त्यामुळे तुम्ही खूप बळकट बनलेले असता आणि तुम्हाला या जगात कोणीच हरवू शकत नाही हे अटक आहे. राहिला प्रश्न लग्नाचा तुम्हाला नोकरी चांगली मिळाली तर लग्न तर होईलच कारण कालपर्यंत तुमच्याकडे काहीच नव्हत पण आज काही तरी आहे या विचारात आनंदात जगा.. जीवन खूप सुखी आहे अजून सुखी मिळवा आता खूप झालं आवडला लेख तर नक्की रिप्लाय द्या दुसरा भाग लिहायला मी सुरू करिन मग नकी…

आता सगळ्यात मोठा प्रश्न हा लीहणारा तरी कोण..? हा कुठं एवढा मोठा झाला आहे ..? हा फक्त मोठ मोठ बोलतो बस याच्या हातून तर काहीच नाही झाल..?

खर तर मी अजून एवढा माणूस मोठा झालो नाही. पण मी सुखी तर आहे. तुम्हाला लेख लीहण्याच, बोलण्याच, समजवण्याच कारण एवढच मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका. आम्ही ज्या वाटेवर जाऊन चुकलो त्या वाटेवर तुम्ही जाऊन चुका करू नका आणि आम्हाला इथवर यायला जेवढा वेळ लागला तेवढा वेळ तुम्हाला लागायला नको. हाच एक माझा प्रयत्न अहो माझाच काय प्रत्येक लेखकाला हेच वाटतो. काल आम्ही वाईट दिवस काढले म्हणून आम्ही आज प्रत्येक संकटाला हसत सामोरे जातो. उद्या तुम्हाला हे भोगावं लागू नये म्हणून हा एक प्रयत्न. बघा पटत का.. काही चुकलो असेल तर माफी असावी…

लेखक :- अनिकेत शिंदे . ( जाधेवाडी , आजरा )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular