भावनांचे फूल उमलले,
कवीमनाच्या अंतरातून.
नाविंन्याची विचारकमले,
उमलूनी येती शब्दांतून.१
विविध रूपे कवितेची,
विविध भाव नवरसांची.
उसळे,कविता विद्रोहाची,
शौर्य कविता वीररसाची.२
स्वप्नवेड्या सुंदरतेची,
मोहक हळुवार प्रेमाची.
नितांत सुंदर निसर्गाची,
वसुंधरेच्या हिरवाईची.३
भक्तीरसाच्या अभंगाची,
विचारमौक्तीके प्रबोधनाची.
वाट दाविती जीवनाची,
प्रगल्भ ऐशा आयुष्याची.४
विरहामधल्या वेदनेची ,
दुःखामधल्या संवेदनांची.
बळीराजाच्या विवंचनेची,
अर्थपूर्ण गर्भित आशयाची.५
ध्यास सदैव कवीमनाचा,
शब्दसृष्टीशी चितारण्याचा.
नाळ भावनांशी जोडण्याचा
अंतरीच्या गूढ ऐशा स्पंदना़ंचा.६
कवी. श्री रेवाशंकर वाघ ,ठाणे
मुख्यसंपादक