Homeमुक्त- व्यासपीठकहाणीचा शेवट…

कहाणीचा शेवट…

           कहाणी असो वा  कथा, सत्यकथा असो वा बोध कथा, गोष्ट सिनेमाची असो वा आयुष्याची शेवट हा आलाच. ही कहाणी मधील अटळ बाब आणि तितकीच संवेदन ही असते. आपण ही एखादी गोष्ट वाचत असताना किंवा ती पाहत असतांना त्यामधील सामग्री (content), पात्र, गंमतीशीरपणा, भावनिक प्रसंग, चढ - उतारा हे भावला असेल तर शेवट काय होईल या कडे विशेष उत्सुकता वाटत राहते. वेळा तर शेवट होऊच नये असा ही वाटत राहते. पण नाही शेवट हा प्रत्येक गोष्टीला येतोच. 
         जस जसं  शेवट येत आहे असा वाटू लागत तस तसं मन वाकुल होऊ लागत शेवट काय होईल? हाच विचार मनात घोंगावत राहतो  मग कहाणी पुस्तकातील असो वा आयुष्यातील सारे तर्क वितर्क लावून झालेले असतात.नवीन पानावर काय लिहलेले आहे याची चिंता नसते पण या कहाणी चा शेवट काय असेल हाच प्रश्न असतो. कहाणीच्या सुरुवातीपासून ते आता पर्यंतची सारी पाने, सारे प्रसंग, मानाचं काहूर करून टाकतात. पण कथेच प्रत्येक वळण लेखकाच्या हाती असते. आणि जर कहाणी माणसाच्या आयुष्यात होणाऱ्या बदलाची असेल तर सारे माप - दंड नियती रुपी लेखकाच्या हाती असते. किती ही पुढे जात असलो तरी मागचा प्रवासात भेटलेले माणसं, घडलेले प्रसंग, आणि त्यामुळे आयुष्यात झालेली जडण-घडण, आणि यातून निर्माण झालेले ओढ या  सर्व गोष्टी माणसाला कथेशी त्या पात्राशी बांधून ठेवतात. 
       ही कथा इथेच संपली तर कथेतील गंमत, इथेच संपनार ?...... परत कधी भेट नाही होणार?....   सारी पात्र काल्पनिक म्हणून कहाणीच्या शेवटी जमा होतील? समजा जणू गाडी सुटत आहे आणि तुम्ही मागे राहिले आहात असे प्रश्न मनाला बाणा प्रमाणे एका मागोमाग एक असे घुसत जातात. शेवटी नियतीच्या मनाप्रमाणे एक दिवस शेवट हा स्वीकारावाच लागतो. याला पळवाट नाही. सर्वच कहाणीचा शेवट गोडच (Happy ending) होतो असा नाही. काही वेळा तो गोड मानावा लागतो. शेवट गोड झाला तर कहाणी पूर्ण झाली असा वाटू लागत पण तेच जर कहाणी चा शेवट विपरीत असेल तर ती कहाणी कागदावर पूर्ण होते पण मनावर खोल वर जाऊन राहते. पण नियती पण फार गंमतीदार असते जर शेवट गोड नसेल तर दुसरी गोड कहाणी लिहण्यास सुरुवात केलेली असते. शेवटी एवढच वाटतं की कथेचा चा शेवट गोड असो वा नसो पण कथेत गमंत पाहिजे तरच ती कथा होऊन जाते. 

✍🏻 – संजू पाटील – कांजूरमार्ग मुंबई

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

2 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular