दिसं येतील दिसं जातील या सुंदर गीताचे गीतकार सुधीरजी मोघे यांची माफी मागून मी केलेले विडंबन…
तुझ्या माझ्या लेकराला बोल काय हवं
मोबाईल विवोचा नि सिमकार्ड नवं
नव्या मोबाईलमधी नवीन असंल
काँलिंगवर समोरचा माणूस दिसंल
काँल येतील, काँल जातील
डोस्क फिरंल,ताप येईल
नेटपँक आला तोही द्या मारूनी
भलं मोठं बील भरा तेही खिशातूनी
कळंल का त्याला,लावायला गाणी
का करील त्यो रोज त्याची मनमानी
पोर आपुलंच मग ऐकंल सगळं
ऐकेना तर उठवू मग पाठीवर वळं
काँल येतील,काँल जातील
डोस्कं फिरंल ताप येईल
दोघावरं खेकसंल त्यो
बिनकामी डापरंल त्यो
कुणालाबी गंडविल
अंदाजबी चुकविल
अभ्यासाचं तीन तेरा वाजवील त्यो
वागंल त्यो खुळ्यावानी
शाणा गं नसंल
तुझ्या माझ्या जिवाला घोर त्यो असंल
बिघडूनिया जाईल तो जागूनिया रात
झोपेसाठी त्याच्या मग होईल पहाट
पहाटंच्या कोंबड्याला यीलं त्याला नीजं
झोपंल गं समजून ते बापाचंच राजं
केवढ्या त्या किमतीचा एवढासा फोन
नको बाबा लेकराची वाजवील टोन
काँल येतील काँल जातील
डोस्कं फिरंल ताप येईल…
✍️ श्री.विजय शिंदे…
३२शिराळा,सांगली.
मुख्यसंपादक