Homeमुक्त- व्यासपीठकाळ सोकावलाय

काळ सोकावलाय

लोकशाही असली तरी जवळ मुबलक पैसा, आरे ला कारे म्हणत समोरच्याला दणके देऊन गप्प बसवण्याची ताकद व बोलण्याची छाप पाडून लोकांना मतांसाठी एकत्र जमवण्याची खुबी या तीन गोष्टी जवळ नसतील तर केवळ उच्च शिक्षणाच्या भांडवलावर राजकारणात पडणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे होय. शिक्षण हे वाघीणीचे दूध, ते पिल्यावर माणूस गुरगुरणारच! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हे वाक्य सुशिक्षित मनाला वेगळीच ताकद देते. पण शिक्षणाच्या जोरावर सामाजिक व राजकीय क्रांती करणे जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जमले तसे आताच्या काळात सुशिक्षितांना जमणे खूप कठीण झालेय कारण काळ सोकावलाय!

  • ॲड.बी.एस.मोरे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular