Homeवैशिष्ट्येकोंकणाविषयी बोलू काही…..

कोंकणाविषयी बोलू काही…..

कोंकण हे महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारे आपले सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. कोंकण बोललो की किनारपट्टी, पर्यटनस्थळे, झाडाझुडुपांनी नटलेलं निसर्गाच्या सानिध्यात असणारे स्थळ अशी ओळख होत असते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पालघर हे कोंकणातील जिल्हे खूप प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही कोंकण पट्ट्यातच आहे. काजू, आंबा, फणस, माड, सुपारी, केळीच्या बागा आणि डोंगरउतारावर असणारी भातशेती इत्यादी गोष्टींमुळे कोंकण खूप मोठया प्रमाणात प्रसिद्ध आहे.
देवगड, रत्नागिरीचा हापुस आंबाही खूप प्रसिद्ध आहे. कोंकण भूमी ही अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. कोंकण म्हणजे जणू स्वर्गच आहे. कोकणात सुप्रसिद्ध असे अनेक गडकिल्ले, सागरी किल्ले, बंदरे, खाड्या, बेटे आहेत. त्यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या सर्वांमुळे कोंकण हे प्रसिद्ध होत आहे. अनेक नामांकित मंदिरे व देवस्थाने ही कोंकणात पाहायला मिळतात. उदा.गणपतीपुळे, मार्लेश्वर, कुणकेश्वर, पाली ,महडचा अष्टविनायक गणपती, परशुराम मंदिर इ. अनेक मंदिरे व देवस्थाने ही प्रसिद्ध आहेत. या सर्व ठिकाणी लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. पर्यटनासाठी अनेक लोकांची ये जा कोंकणात होत असते. पर्यटनासाठी पोषक असे वातावरण हे कोंकणात असते. कोंकण बोलले की लगेच आपल्याला आठवते ते म्हणजे निसर्गरम्य वातावरण. पावसाळ्यात तर कोंकणातील निसर्ग जणू नटलेला दिसून येतो. सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. श्रावण महिन्यात तर कोंकणातील निसर्ग हा खुलून दिसतो. गणपती, होळी, शिमगा हे सण साजरे होत असताना यावेळी कोंकणातील वातावरण हे एकदम शांततेचं आणि उत्साहदायी असते. यावेळी पूर्ण कोंकण हे गजबजलेले असते. कोंकणामध्ये पर्यटनाला पोषक असे वातावरण आहे. बहुतेक लोकं ही कोंकण पाहण्यासाठी आवर्जून येत असतात आणि तेथील वातावरणाचा आनंद लुटत असतात. केवळ वातावरणाचा आनंद लुटत नाहीत तर तेथील निसर्गसौंदर्याची मजा घेत असतात.

आपण कोणत्याही भागामध्ये फेरफटका मारायला गेलो तरी तेथील निसर्गसौंदर्य, डोंगराळ भाग, आपल्याला वेडावून टाकत असतो. इतके सुंदर दिसणारे, डोळ्यांना दिपवून टाकणारे कोंकण आहे. कोंकणातील वातावरण, राहणीमान खूप चांगले आहे. पर्यटकांना भुरळ पाडून पुन्हा भेट देण्यासाठी आकर्षित करणारे असे कोंकण आपल्याला लाभलेले आहे. केवळ पर्यटनासाठी नाही तर विविध कारणास्तव कोंकण हे प्रसिद्ध आहे. भजन, कीर्तन, जाखडीनृत्य, नमन, भारुड इ. पारंपरिक कार्यक्रमांनी कोंकणाला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली आहे. आजही हे कार्यक्रम मोठया उत्साहात कोंकणात साजरे केले जातात. या सर्व कोंकणातील कला सुप्रसिद्ध आहेत. कोंकणातील असलेली संस्कृती ही आजही जपलेली आहे. यामुळे कोंकणातील वेगळेपण दिसून येते.
गणपतीपुळे, तारकाली, हरिहरेश्वर, अलिबाग अशी अनेक कोंकणातील ठिकाणे ही पर्यटनासाठी खूप सुप्रसिद्ध आहेत. याठिकाणी पर्यटक हे खूप मोठ्या प्रमाणात येत-जात असतात. कोंकण हे पर्यटनाच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. तिथे असणारी सर्व पर्यटनस्थळे, मंदिरे, देवस्थाने, गडकिल्ले, स्वच्छ व सुशोभित ठेवणे हे कायमस्वरूपी आवश्यक आहे. त्यामुळे कोंकणातील पर्यटनाचा स्तर हा उंचावेल आणि कोंकण हे अजून वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचेल. कोंकण हे आपल्याला लाभलेली निसर्गाची देणगी आहे. ते जपणे आपले कर्तव्य आहे. निसर्गनिर्मित कोंकण आपल्याकडे आहे हे आपले भाग्य आहे. त्याची योग्य ती काळजी घेऊन त्याच्या पर्यटनासाठी जे काही करावे लागेल ते करून आपण त्याची योग्य ती दखल घेतली पाहिजे. कोंकणातील पर्यटनस्थळे स्वच्छ व सुशोभीकरण करून पर्यटकांची संख्या अजून कशी वाढेल व पर्यटक आवर्जून कसे आकर्षित होतील या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. तर कोंकणात जे पर्यटक येत आहेत यापेक्षाही मोठया प्रमाणात पर्यटक येत राहतील त्यांची संख्या अजूनही वाढत जाईल याचा फायदा हा कोंकणातील पर्यटनासाठी होईल व कोंकणचा विकास होण्यास हातभार लाभेल.

कु. रोहित राजाराम काबदुले.
करंबेळे तर्फे देवळे,झोरेवाडी,
ता.संगमेश्वर,जि. रत्नागिरी.


विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular