क्रांतीसूर्य तूम्ही लावलेल्या समतेच
रोपट आज महान वटवृक्ष झालाय.
त्याच्या छत्रछायत अनेकांनी
आपापला उद्धार करून
घेतला पण बर्याच जणांनी
आपापल्या चौकटी आखून
तुमचे अनुयायीत्व स्वीकारले
आहे ज्याने त्याने
आपापल्या सोयीनुसार.
तूमच्या पगडीचा प्रचार
तर खूप झाला
पण तूमच्या विचाराने
प्रेरित डोके अजून नाही
भेटले तिला तूमच्या नंतर.
शिवराय, फूले, शाहूमहाराज,
बाबासाहेब ज्याने त्याने वाटून
घेतले दूकानदारीच्या
हुकमी यशस्वीतेसाठी.
तूमच्या विचाराचा कार्याचा
वारसदार आहे म्हणताना
भितीच जास्त वाटते
की आपल्यालाही अडकवले
जाऊ नये जातीयतेच्या
चौकटीत जिला तूम्ही
सर्वांनी साप नाकारलय.
- जगन्नाथ काकडे
मेसखेडा
मुख्यसंपादक