काय दुर्भाग्य माझे
मला माईंनच नाकारल !
तिच्याच बहराला
वेलीनच गाळल !!
खुडला कोंब माझा
उगवण्या आधीच !
नाक दाबले माझे
मी रडण्या आधीच !!
पाहिले मला
आंतर भींग लाऊन !
झिडकारले मला
मी मुलगी पाहून !!
काय केला गुन्हा
जगाच्य गोटात. !
मारले मला
आईच्या पोटात. !!
जर सार्व समाज
मला आसेच नाकारेल !
तर नवरीस नवरा
जल्म भर मुकेल. !!
समता जाणून
समरसता आणा !
मुलगा मुलगीस
सारखे जाणा!!
- जगन्नाथ काकडे मेसखेडा
मुख्यसंपादक