गुरूब्रम्हा गुरर्विष्णु, गुरू र्देवो महेश्वर:
गुरू साक्षात परब्रम्हः, तस्मै श्री गुरूवे नम:
गुरु म्हणजे ‘मार्गदर्शक’ आणि पौर्णिमा म्हणजे ‘प्रकाश’. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु हा असतोच आणि तो आपल्या शिष्यावर प्रकाश पडण्याचं काम करत असतो. काहींच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर म्हणजेच प्रत्येक क्षेत्रात शिकवण देऊन मार्गदर्शन करणारे वेगवेगळ्या व्यक्तींना गुरु मानतात. माझ्या आयुष्यात देखिल असेच माझ्या पाठीशी आणि मला प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक वळणार भेटलेल्या व्यक्तींना मी माझा गुरु मानतो.
ज्यांनी मला या पृथ्वीवर जन्म दिला.ज्यांनी मला चालायला-बोलायला शिकवलं,चांगले संस्कार दिले,प्राथमिक ज्ञान दिले ते म्हणजे माझे आई-बाबा हे माझ्या जीवनातील पाहिले गुरु. आईबाबा नंतर शिक्षण क्षेत्रात आयुष्याच्या जडणघडणीला वळण लावून आपल्याला प्रगतीपथावर पोचवण्याचा मार्ग दाखवणारे शैक्षणीक क्षेत्रातील गुरु म्हणजेच माझे शिक्षक. शिक्षकांच्या कडून ज्ञानप्राप्ती घेतल्यानंतरही आजही प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेदिवशी शिक्षकांना फोन करुन शुभेच्छा देत असतो.आठवणीने फोन करून शिष्याने दिलेल्या शुभेच्छाचा स्वीकार करून शिक्षक आशीर्वाद देत असतात.
समाजात जगत असताना किंवा वावरत असताना अनेक व्यक्ति भेटत असतात.मला आवर्जून सांगावंस वाटत की कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई ही सामाजिक बंधिलकी जपणारी संस्था ही पण माझ्यासाठी गुरु प्रमाणेच आहे. या संस्थेतून मला ज्या थॊर मोठ्या व्यक्तींनी समाजाच्यात राहणाऱ्या व्यक्तीची नाळ ,समाजिक बांधिलकी,सामाजिक सेवा,मैत्रीचा सलोखा,आपुलकी ,प्रेम अडचणीच्या काळात सतत मार्गदर्शन व मदत करण्याची कला ,आणि चांगल्या लोकसेवेतुन मिळणारी चांगल्या पुस्तकरूपी व्यक्तीची ओळख आणि मार्गदर्शन मिळत असते.
या सर्वांची सांगड घालून देणारा सर्वात मोठा गुरु म्हणजेच परमेश्वर. प्रत्येक वळणार , दुःखात असो वा सु:खात मदत करणारा, मार्गदर्शन , आशिर्वाद देणारा परमेश्वर हा माझ्या आयुष्याच्या वाटेतील सर्वात मोठा गुरु आहे. तो आहे म्हणून आपण आहोत आणि प्रत्येक संकटाला तारून नेहण्याची शक्ती ही परमेश्वराकडूनच मिळत असते.
अश्या या प्रत्येक गुरुजणांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाची आणि आशीर्वादाची शिदोरी सोबत घेऊन जात असल्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयास केला आहे. लहानापासून ते आजपर्यंतच्या प्रवासात भेटलेल्या सर्व गुरुजनांना “गुरुपौर्णिमेच्या” हार्दिक शुभेच्छा.
- शैलेश बाळासाहेब मगदूम
निंगुडगे (कोल्हापूर)
मुख्यसंपादक