Homeमाझा अधिकारग्राहकांना मिळालेले अधिकार किती व कोणते ?

ग्राहकांना मिळालेले अधिकार किती व कोणते ?

भाग २

मागील भागात आपण ग्राहक संरक्षण कायद्याचा इतिहास व पाश्वभूमी पाहिली आहे..

प्रत्येक ग्राहकाने आपल्या हक्कबाबत जागृत असणे आवश्यक आहे. मात्र त्यांना आपले अधिकार कोणते याची माहिती नसल्याने वंचित राहावे लागते. तर ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्या प्रमाणे ६ अधिकार ग्राहकांना देण्यात आले आहेत. त्याची सविस्तर माहिती आपण घेऊ…

१) सुरक्षिततेचा हक्क -: जेव्हा आपण एकादी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्याने वस्तूच्या फायद्यासोबत सुरक्षिततेची हमी विक्रेत्यांनी द्यावी . उदा. आपण गॅस घेतो तेव्हा ते लिकेज होऊन स्फोट होणार नाही , टॅक्सीने प्रवास करताना त्यांचा मेंटन्स व्यवस्थित असेल ज्यामुळे अपघात होनार नाहीत, ओषधा बाबत बोलायचे झाल्यास विषारी असेल तर त्यांचा स्पष्ट उल्लेख किंवा सूचना कव्हरवर देण्यात यावी. हॉटेल मध्ये राहतो त्या ठिकाणी चोरी किंवा जीविताला धोका उत्पन्न होणार नाही अशी सुरक्षितता विक्रते किंवा सेवा देणाऱ्या संबधित व्यक्तीने द्यायला हवी.

२) माहितीचा अधिकार-: उत्पादक घेण्यापूर्वी ते कुठे बनवले ? त्यातील घटक , शुद्धता , वजन, दर्जा , तसेच छापील MRP किंमत , खाण्याची वस्तू असेल तर ती शाकाहारी आहे की मांसाहारी , उत्पादनाची तारीख तसेच शेवटची तारीख , तक्रार निवारण तपशील , वस्तूसाठी विमा , अनुदान , कन्सेशेन , तसेच वाँरंटी , गँरटी व अटी ची माहिती घेण्याचा अधिकार ग्राहकांना आहे.

३) निवडीचा अधिकार-: कोणत्याही दुकानात विविध प्रकारच्या वस्तू किंवा सेवा उपलब्ध असतात. त्यातील कोणत्याही प्रकारची वस्तू तो खरेदी करू शकतो ; त्यामुळे त्यावर विक्रेत्यांनी हीच वस्तू घ्या असा आग्रह करू शकत नाहीत. तसे केल्यास तो ग्राहकाच्या निवडीच्या अधिकाराचे उल्लंघन करतो .

४) स्व मत मांडण्याचा हक्क-: एकाद्या सेवा किंवा उत्पादन बद्दल आपले म्हणणे , मत किंवा अभिप्राय , अनुभव , मांडण्याचा हक्क ग्राहक संरक्षण कायद्यात समाविष्ट आहे.

५) तक्रार निवारणाचा हक्क-: एकाद्या वस्तू किंवा सेवा मध्ये दोष आठल्यास आणि त्यामुळे आथिर्क , मानसिक , शारीरिक नुकसान झाल्यास अश्या तक्रारींचे निवारण करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. त्यासाठी लोकशाही दिन , ग्राहक परिषद , ग्राहक हितासाठी काम करणाऱ्या संस्था ,ग्राहक आयोग , ग्राहक पंचायत या माध्यमातून ग्राहक आपल्या तक्रारी चे निवारण करू शकतो.

६) ग्राहक सजकता-: ग्राहक हक्काची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला हवी. ग्राहक हक्क व कर्तव्य यांचा प्रचार आणि प्रसार झाला तरच हळूहळू लोकांच्यामध्ये त्यांचे ज्ञान प्राप्त होईल. यासाठी सरकारी व निमसरकारी तसेच गैरसरकारी संस्थांनी चर्चासत्रे , कार्यक्रम, कार्यशाळा , मेळावे , शिबिरे तसेच प्रसारमाध्यमानी त्याची प्रसिद्धी करावी .
आम्ही लिंक मराठी च्या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न करीत आहोत जर तुम्ही ही आम्हाला साथ द्याल तर आमचे प्रयत्न लवकरच सफल होतील.

संकलन- अमित गुरव
क्रमशः

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. मायबाप आता एवढं केलंत तर बाकी राहिलेलं पण कृपा करून सांगा 🤗 ग्राहक मंच किती आहेत?
    तिथे तक्रार कशी दाखल करायची ?
    आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टींवर तक्रारी दाखल केल्या गेल्या आहेत 😁 त्यात संबंधित व्यक्तींना कसा लाभ भेटला आहे ?😍
    सदर लेख खूप आवडला आपला मनापासून आभारी आहे 🙏💯

  2. गरजेची उत्तम माहिती दिली आहे..धन्यवाद व पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

- Advertisment -spot_img

Most Popular