Homeमाझा अधिकारग्राहक संरक्षण कायद्याचा इतिहास किंवा पाश्वभूमी

ग्राहक संरक्षण कायद्याचा इतिहास किंवा पाश्वभूमी

भाग १-:

देशात ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जवळपास ३० वेगवेगळे कायदे केले आहेत. नवीण ग्राहक संरक्षण कायदा ९ ऑगस्ट २०१९ ला संसदेत पारित झाला पण २० जुलै २०२० रोजी त्याचे नियम जाहीर करण्यात आले. तसा तो १९८६ पासून अस्तित्वात होताच पण ३४ वर्षात बाजारपेठेत इतके बदल घडून आले आहेत की त्यात सुधारणा किंवा अपडेट करून घेणे गरजेची बाब होती.
कारण आज लोक दुकानातून खरेदी न करता ऑनलाइन खरेदी करताना दिसतात. तसेच जाहिरात पाहून वस्तू , किंवा सेवा विकत घेण्याचा निर्णय घेण्यात येतो.
१५ मार्च १९६२ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी ग्राहक हक्काची घोषणा केली. त्यामुळे १५ मार्चला जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. ग्राहक हितासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थेच्या चळवळीच्या माध्यमातून २४ डिसेंबर १९८६ रोजी आपल्या भागात राष्ट्रपतींनी मंजुरी दिली म्हणून २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून सम्पन्न करतात.
२०१९ च्या ग्राहक संरक्षण कायद्यात ग्राहक आयोगाच्या आर्थिक मर्यादा वाढवण्यात आल्या , कोर्ट फी मध्ये खुप सवलत दिली , खोट्या व दिशाभूल जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटी च्यावर सुद्धा कारवाई ची तरतूदी केल्या आहेत तसेच अशे नानाविविध अधिकार ग्राहकांना मिळालेत.

क्रमशः

संकलन – अमित गुरव ( पत्रकार )

      टीप-:  अशी कायद्यासंदर्भात अधिक माहिती आपल्याकडे असल्यास लिंक मराठीशी  संपर्क साधावा. 

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular