आजरा ( हसन तकीलदार ):-शिवसेना (शिंदे गट) व डॉ. श्रीकांत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 8/6/2025 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदत्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवित रक्तदान श्रेष्ठदान केले. या कार्यक्रमाचे नियोजन सौ. धनश्री देसाई (महिला जिल्हाप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष )यांनी केले तर शिबिराचे उदघाटन प्रशांत साळुंखे (संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र शिवसेना वैद्यकीय कक्ष )यांच्या हस्ते करण्यात आले.
या कर्यक्रमाचे औचित्य साधत यावेळी विविध पदावर नियुक्त्या करीत नियुक्तीपत्रेही देण्यात आली. डॉ. सुरजीत सुधाकर पांडव यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आजरा तालुका प्रमुख पदी मंगेश चिवटे (शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख )यांच्या सहीचे नियुक्ती पत्र देण्यात आले आणि उमा संकपाळ यांची महिला तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

आजरा भागातील रक्तदात्यांनी अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जवळ जवळ 73जणांनी रक्तदाते म्हणून सहभाग नोंदवला आणि रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास विनायक जरांडे (जिल्हा प्रमुख ), निलेश पाटील (उपजिल्हाप्रमुख ), मानसिंग देसाई, सतीश पवार, हर्षवर्धन देसाई तसेच शिवसेना कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Youtube लिंक👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक