चहा पिण्याची प्रत्येकाची विशिष्ट अशी पद्धत असते. त्याचे निरीक्षण केल्यास स्वभावाचा बर्यापैकी अंदाज घेता येतो. आपणही निरीक्षण करा आणि अंदाज बांधा…
- चहा घ्यायचा का चला चहा घेऊ, स्वतःहून अशी ऑफर देणारे सर्वसमावेशक स्वभावाचे असतात. यांचा फारसा कुणाशी वाद नसतो…
- चहाला प्रथमदर्शनी नाही म्हणणारे परिस्थितीचा अंदाज घेऊन वागत असतात..
- मोठा भुरका मारून चहा पिणारे फारशी कोणाची तमा बाळगत नाहीत. जे योग्य वाटेल ते करून मोकळे होतात..
- गरम चहा पटकन पिऊन टाकणारे सतत गंभीर विचार करत असतात. प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेचे टेन्शन घेतात.
- चहाचा प्रत्येक घोट आस्वाद घेऊन पिणारे महत्त्वाच्या ठिकाणी उशिरा पोहोचतात.
- चहाचा ग्लास अथवा कप हाताने पूर्ण कव्हर करून पिणारे केअरिंग असतात. आजारी व्यक्तीची जरा अधिक चौकशी करतात.
- चहा गार अथवा गरम याचा फारसा विचार न करता पिणारे व्यवहार कुशल असतात..
- विशिष्ट प्रकारच्या चहाची ऑर्डर देणारे फारसे कुणात मिसळत नाहीत..
- विशिष्ट ठिकाणीच चहा घेणारे पटकन गैरसमज करून घेऊ शकतात…
- चहा पिता पिता एखादा विनोदी किस्सा सांगणारे थोडेसे बेफिकीर असतात..
- ग्लास अथवा कप विशिष्ट पद्धतीने धरूनच चहा पिणारे एखाद्या विषयात तज्ञ असतात…
- सर्वांसाठी चहा सांगतात, पण स्वतः घेत नाहीत, असे चांगले सल्लागार असतात. क्षणात परिस्थिती ओळखतात..
- नियमित प्रकारातला चहा न घेता विशिष्ट पद्धतीचा चहा घेणारे अबोल अनप्रेडिक्टेबल असतात..
- चहा शिवाय ज्यांची बॅटरी चार्ज होत नाही, अशी मंडळी महत्वाच्या निर्णयांची बऱ्याच ठिकाणी खात्री करूनच ठरवतात.
- बसूनच शांतपणे चहाचा आस्वाद घेणारे कमी लाभाची परंतु खात्रीशीर गुंतवणूक करतात…
- बशीतून चहा घेणारे कोणत्याही बाबतीत लवकर कन्व्हिन्स होत नाहीत…
- चहा घ्यायचा म्हणून घेणारे गाव मित्र असतात..
- चहा गार करून पिणारे कलाकार असतात. बोलताना अचूक शब्दच वापरण्याकडे कल असतो.
- चहाची वेळ अजिबात न चुकवणारे, प्रसंगी एकटा चहा पिणारे सहजपणे शब्दात अडकू शकतात..
- अधून-मधून चहा घेणारे नर्मविनोदी असतात..
- चहा संपेपर्यंत अजिबात न बोलणारे चिडखोर असू शकतात…
- चहासोबत बिस्किट खारी अथवा पाव खाणारे कोणत्याही परिस्थितीत मध्यम मार्ग स्वीकारतात…
- कोणत्याही प्रकारचा चहा बिलकुल वर्ज्य असणारे लोक स्वतःच करून घेतलेल्या एका विशिष्ट चौकटीत राहत असतात..
आपणही आपले
निरीक्षण नोंदवा.
- साभार – कुठेतरी वाचलेले
मुख्यसंपादक