दूभागंल हे हिरव सपाण
चिपाड झाली जिदंगाणी!!
भेगाळल्या भूइला
पाजू किती आसवाच पाणी !!धू!!
राखनारे चोर सारे
शाहू देशोधडीला
पोखरली शिखरे सारी
लागली उदंरे गढीला
पसरला अंधार अण
ओठांवर प्रकाशाची गाणी
चिपाड झाली जिदंगाणी…..!!१!!
दूख उर भरून साडंल
सोसू किती मरणळा
आज टांगणीला जिव असा
फास मागतो गळा
ना विसावा कोन्ही कसेही
फसवा सोस मुक्या वाणी
चिपाड झाली जिदंगाणी. …!!२!!
आभास सुखाचा का असा
अण करपला गोडवा
राखेतून भडकती ज्वाला
इतिहास आपला घडवा
बेईमान निष्ठूरही
सागंत यती निशाणी
चिपाड झाली जिदंगाणी …..!!३!!
- जगन्नाथ काकडे
मेसखेडा
मुख्यसंपादक