सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीतून , अनमोल हिरा तेजाने चमकला
शिवनेरीवर माता जिजाऊच्या पोटी , १६३० ला माझा राजा जन्मला…
हरवूनी त्याने शत्रूंना , मराठ्यांचा तो आधार झाला
शक्ती आणि युक्ती वापरून , हरवले त्यांनी खानाला…
सोबत नसताना हि जास्त मावळे , राखले त्यांनी भगव्याला
स्वतः भोगले खुप दुःख , पण सुखी ठेवले जनतेला…
माता बहिणी मानून , आदर दिला स्त्री जातीला
विषमता , गोरगरिबी दूर करुनी , मान मिळवून दिला रयतेला..
ताजमहल पेक्षा , आमच्या शिवनेरीला मानतो आम्ही
तन मन अर्पूनी छत्रपती राजेंचा मान राखतो आम्ही…
रायगड , राजगड , तोरणा , प्रतापगड जिंकले खुप किल्ले
राजाच्या नुसत्या चाहुलीने शत्रूंचे साऱ्या धाबे दणाणले…
जिजाऊ आणि शहाजी राजेंचा विश्वास त्यांनी कायम राखला
तलवारीच्या पातीवर त्यांनी , मराठ्यांचा इतिहास रचला…
असा आमचा राजा धाडसाचे , शौर्याचे धडे शिकवून गेला
या भूमीला आपल्या रक्ताने पावन तो करून गेला…
आधी लग्न कोंढान्याचे , मग आपल्या रायबाचे ऐकुनी तो हरखून गेला
थोर अशा मावळ्यांना मनामध्ये साठवत गेला…
छत्रपती शिवाजी महाराज की जय , अशा घोषणा दमदमु लागल्या
माझ्या राजाच्या गाथा ऐकुनी डोळ्यांच्या कडा पाणावु लागल्या….
डोळ्यांच्या कडा पाणावु लागल्या…
कु. अमृता भिकाजी राणे
विनायकवाडी , आजरा
मुख्यसंपादक