अहो जग पुढे गेले,हाक ऐकू येते कानी
जर एवढी प्रगती,हतबल कोरोनानी….
विकासाचा बोलबाला,वृक्षतोड भयंकर
समतोल ढासळला,निसर्गाचा हा कहर….
उंच उंच इमारती,जीवघेणी झाली स्पर्धा
हरवली माणुसकी,प्रेम कुठे आहे मर्दा ? ..
झाला संपर्क जगाशी,मोबाईल हाती आला
स्वास्थ्य हरवले त्याचे, विश्वासाला तडा गेला..
अहो जग पुढे गेले,धावायला सांगे त्याला
एक क्षण ठरलेला,तुझ्या आठव मृत्यूला….
कशासाठी पळायचे?,त्याचे उत्तर शोधावे
जरी गेले पुढे जग,तुझे आयुष्य जगावे….
– कवी – किसन आटोळे सर
मुख्यसंपादक