लेक होवूनी आले जन्मा
नका संपवू मला
आठवा त्या राणी लक्ष्मीला
आठवा त्या सावित्रीला….
संपवूनी मला कोण बांधीन
राखी दादाला?
बाबा दिवा पाहिजे वंशाला?
मग समई होवूद्या मला….
समई होवून प्रकाश
देईन दोन्ही घरी
मग आनंद होईल जगाला
लेक होवूनी आले जन्मा
नका संपवू मला….
एक खुनी म्हणून मिरवताना
मला नाही पाहायचं तूम्हाला
एक स्त्री असूनही पराक्रमाचे
धडे गिरवले, विसरलात त्या
सावित्रीला नि जिजाऊला
जन्माला येवू द्या मला….
लेक होवूनी बनेल तूमचा आधार
इवलसं आहे बाबा स्वप्न माझं
सांगा कराल तूम्ही साकार?
लेक होवूनी आले जन्मा
नका संपवू मला
नका संपवू मला….
( आज जागतिक कन्यादिनाच्या सर्व बालकन्यांना गोड गोड शुभेच्छा )
- सौ.भाग्यश्री आपेगांवकर
मुख्यसंपादक