कविता म्हणजे मनातल्या भावना
कुणीतरी कुणासाठी लिहिलेल्या
कुणाचं तरी प्रेम तर कुणाचा विरह..
कविता म्हणजे पावसाच्या आठवणी
निळ्याभोर आकाशातले ते चंद्र तारे
तर कुणाचं राहून गेलेलं प्रेम
एक अविस्मरणीय आठवण...
कविता म्हणजे शब्दांची जुळवाजुळव
मनातल्या भावनांनवर
हळुवारपणे मारलेली फुंकर…
कविता म्हणजे एक कोरा कागद
अन् त्या कोऱ्या कागदावर
मारलेली ती एक रेष ...
रेष..

मुख्यसंपादक