वेगळंच हटके काहीतरी सुंदर केल्यावर होणारा आनंद शब्दातीत असतो. कौतुकाचा वर्षाव होतो, कुठेतरी उत्तमरित्या दखल घेतली जाते. यशोशिखर काबीज केल्याने हुरळून जातं मन, त्याच मनात उठतं जातात सुखदं तरंग, पुढे धावायला मिळते उर्जा. ‘ जो न देखे रवी, वो देखे कवी’ ह्या ओळींची यथार्थता अशीच एका कवीने सफल करून दाखवली. ते आहेत सोलापूर रहिवाशी श्री.प्रशांत विजय राजे. ३१ जुलै, २०१५ रोजी त्यांनी ओळीने १७ तासांपेक्षा अधिक काळ एकपात्री कार्यक्रम करून जागतिक विक्रम केला. जागतिक कीर्तीच्या या घटनेला नुकतेच एक वर्ष झाले. सोलापूरचे कविराज विविध ठिकाणी आपले कार्यक्रम सादर करीत आहेत. गुजरातेतील पोरबंदर शहरी हिंदी अणि इंग्रजी असा संमिश्र ‘दिलसे दिलोंतक’ ह्या त्यांच्या कार्यक्रमासाठी त्यांना खास निमंत्रण आले आहे. कविता सादरीकरणासाठी प्रविंना नेहमीच कुठून कुठून बोलावणे असते. आत्ता पर्यंत त्यानी १२५ स्वरचित कवितांचे कार्यक्रम केलेले आहेत. फ़क्त स्वत:च्याच कविता ते सादर करतात तेहि अगदी तासनतास.
प्रविंचे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांवर प्रभुत्व आहे. त्यांचा कुठलाच कार्यक्रम एकसुरी नसतो, जसे भाषेचे वैविध्य तसेच सादरीकरणातही अनेकविध प्रकार दिसतात. कविता, गाणी, चुटकुले, अनुभव, संवाद, गद्यपद्य, अणि उत्तम सिनेसंगित असा सर्व मिश्र भाव त्यांच्या कार्यक्रमाची रंगत वाढवित जातो. सहजगत्या या भाषांमधे इकडून तिकडे जाता येता माहोल फुलत जातो अणि अनेकविध तर्हेचे सादरीकरण लोकांची दाद घेतेच.
कवितांशिवाय कविराज दुसरे करणार काय? बरोबर आहे हे. कविता केली जात नाही, तर ती जन्मावी लागते असे म्हणतात. विषयानुसार तत्क्षणी काव्यरचना मांडण हे मात्र काविकौशल्य असते, ती परमेश्वराने दिलेली देणगी असते. असेच एकदा रेकोर्डिंग संपल्यावर अचानक इशारा आला, “कवीजी और एक कविता बैठ सकती हैं.” तत्क्षणी प्रविंनी माईक उचलला, डोक्यातून पोटात न जाता शब्द एकदम ओठातून बाहेर आले, एक कविता तिथेच त्या सीडीत डायरेक्ट उमटली.
फिलिंग्ज, मनामध्ये उठणारे तरंग. मी फक्त बोलतं गेलो, त्याची एक कविता झाली…
आखरी सपना
दिलमें जो तरंग उठते है ……??????
“कविता म्हणजे नक्की काय? भावनांची स्पंदने तुमच्या मनात रुंजी घालत असतात, ती तुमच्या ओठांद्वारे बाहेर पडणं, किंवा कागदांवर उमटतात, की झाली कविता. प्रत्येक माणसात एक कवी दडलेला असतो.” असे असले तरी कविता करणारे विरळेच आहेत, आणि त्यातूनही कवी प्रविंसारखे आणखीनच विरळ.
मातृभाषा मराठी, शिक्षण मातृभाषेत. त्याने मराठीत विपुल काव्य लिखाण केलेच. अप्रतिम कविता रचल्या. तसा खूप अभ्यास करून कविता केल्या नाहीत, आपसूक आल्या बाहेर, टिपल्या कागदाने इतकेचं. टिपताना एका शिस्तीत उतरल्या तिथे, सुरवातीलाच वेळ नमूद केली, कविता धावत येऊन बसली, तिला स्थानापन्न होऊ दिलं आणि मस्त सही ठोकून तिथेही वेळ नमूद केली. हे वैशिष्ट्य प्रविंचे. ना कुठे खाडाखोड, ना वरचे खाली घेणं ना शब्दांची जुळवाजुळव. एकटाकी कविता त्याही हजारोंच्या संख्येने. इथेच कवीची विषयाची समज, त्याच्या भावार्थाची अचूक मांडणी, शब्द सामर्थ्य, आणि भावनांनी ओतप्रत अशा मानवी मनाचा ठाव घेणाऱ्या मनाला भिडणाऱ्या उत्तमोत्तम कवितांची निर्मिती, आणि हो शेवटी स्वत:च्याच कवितांचे प्रवाही दर्जेदार सादरीकरण…. ह्या सर्वांचा मिलाप प्रविंच्या कार्यक्रमात जाणवतो.
कविता वाचण्यापेक्षा कवीच्या तोंडून ऐकण्यात मजा असते, तिथे कवी मन कवितेशी करीत असलेली सलगी इतरांना मोहून टाकते.
मातृभाषेत सग ळेच लिहितात, परंतु प्रविंनी मराठी बरोबर हिंदी मध्ये २ वर्षात २१०० कविता रचल्या. यही तो हटके कहनेवाली बात हैं. कवी प्रवि- प्रशांतजींचे वडील श्री.विजय सैन्यात होते, चीन बरोबरील युद्धात ते लढलेले असल्याने घरातच देशभक्ती ओतप्रत वहात होती. सैन्यातील नोकरी म्हणजे बदल्या आल्याच, जिथे जाऊ तिथली भाषा आत्मसात करता करता विजयजींनी अनेक भाषा आत्मसात केल्या होत्या. मराठी हिंदी बरोबर त्यांना पंजाबी, बंगाली व आसामी भाषा त्यांना येत होत्या. तिथेच प्रशांतला भाषांप्रती जवळीक वाटू लागली. तिथेच भाषांचा अभ्यास, त्यांना आत्मसात करायची धडपड सुरु झाली. आत्ता जे काही ते करतात, त्या मागे वर्षानुवर्षांचा त्यांचा अभ्यास, प्रयत्न, जिद्द, मांडणी आहे हे कोणीही मान्य करेल. हिंदीचा गोडवा आवडला, खूप हिंदी ऐकलं आणि हिंदी काव्य रचना सहज कागदावर उमटल्या. हस्तलिखित कवितांचे २१ कविता संग्रह तयार आहेत. दोन वर्षांच्या कालावधीत ४००० पानांचे लिखाण, २१०० हिंदी कविता, तशाच मराठीही. हे सुद्धा एक कोणीही मोडू शकणार नाही असे रेकॉर्ड या कवींनी केलेले आहे.
घरातले सुसंस्कारित वातावरण, आईवडिलांचे मार्गदर्शन आणि परमेश्वराची कृपा याने लेखणी वाहती झाली, तिने गती घेतली, इतरांनी त्यांची दाखल घेतली. पोटापाण्यासाठी दररोज सोलापूर ते पंढरपूर प्रवास करून दिवसभराची नोकरी करता करता अशी ही काव्यारधना, साहित्यापुजा, आणि रसिकांची सेवा प्रविजी करीत आहेत. घरदार, नोकरी संसार, लेखन वाचन मनन आणि सादरीकरण तेही फक्त आपल्या कवितांचे नक्कीच कौतुकास्पद आहे. म्हणूनच भरभरून दाद मिळते. श्री. प्रशांत राजे, हे पंढरपूर येथे न्यायालयात सहाय्यक अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
कायदा, कानून, कोर्ट, न्यायालय, खटले आणि भांडण अशी नोकरी आणि एकीकडे काव्याचा मनस्वी ध्यास या दोन टोकाच्या दोन भूमिका प्रशांतजी दररोज करीत असतात.
प्रविजी प्रत्येक कार्यक्रमाची सुरवात आईच्या कवितेने करतात. कवितेचे शीर्षक “माझी माय”. आईच्या बाबतीत अतिशय हळवे मन आईला नमस्कार करून आशीर्वाद घेतल्यावरच कार्यक्रम सुरु करतात. नाव प्रशांत मग हे प्रवि काय आहे? असं वाटतं. नावातला ‘प्र’ त्याला जोडून वडिलांच्या नावातला ‘वि’ असे ते प्रवि नाव. कविराज म्हणतात, “काय सांगा, भविष्यात माझी एखादी कविता अजरामर होईल. त्यावेळी माझ्या नावाबरोबर माझ्या बाबांचे नाव देखील अजरामर व्हायला हवे म्हणून मी प्रशांत विजय याची अद्याक्षरे घेऊन ‘प्रवि’ हे नाव लावतो. मला कवी प्रवि या नावानेच ओळखावे असे मला वाटते. मातृपितृभक्तीचे मूर्तिमंत दर्शन असे होते.
वडिलांकडून मिळालेला भाषांचा वारसा प्रविनी वृध्दिंगत केला. सैनिकाचाच मुलगा म्हणजे रक्तातच देशभक्ती ठासून भरलेली. भिनलेले देशप्रेम उसळतेच आणि शब्दातून पाझरते…….*
तिरंगा यही मजहब हमारा ????????
आता थोडेसे एकपात्री प्रयोगांबद्दल. एकपात्री सादरीकरण करणारे अनेक कलाकार आहेत, त्यातूनही कवितांसाठी श्री.विसुभाऊ बापट आणि श्री.सुधीर मोघे यांची कारकीर्द मोठी आहेच.
तसेच श्री.संदीप खरे ह्यांचेही शेकडो कार्यक्रम झालेत. कवी प्रविंनी एकाच शीर्षकाने कार्यक्रम केले नाहीत. तर त्यांनी वैविध्यतेने एकपात्रीत प्रयोग केले. ‘काही क्षण सजवू यात, प्रेमावर बोलता बोलता’, ‘कशीश तुम्हारी, कोशिश हमारी’, ‘ विसरायचं नाही मला’, ‘रेतीतल्या पाऊल खुणा’, ‘तो पाऊस’, ‘सोहळा तिरडीवरचा’, ‘सौंदर्य’, अशा वेगवेगळ्या शिर्षाकांनी त्याला अनुसरून कवितांचे सादरीकरण प्रवि करतात. शीर्षक कुठलेही असले तरी समोर बसायला जागा मिळेलच असे नाही. —–+++ असे शीर््षकांना साजेसे वैविध्यतेने सादरीकरण केले. सादरी करणात केवळ कविता दिल्या तर प्रेक्षकांना बोअर होईल, हे ओळखून कविराज कवितांचे बरोबर मराठी हिंदी गीते सादर करतात, विनोद चुटके यांनी माहोल हालता डोलता राहतो. आणि प्रेक्षक निवेदनासही टाळ्या देतात. हे अगदी खरं आहे.
एकामागून भराभरा एकेक कार्यक्रम करताना कवींची विविध प्रकारे रेकॉर्ड्स सहज झालीत. जातिवंत कलाकार रेकॉर्ड्स साठी सादरीकरण करीत नाही, तर सादरीकरण करता करता कधी रेकॉर्ड केलं जातं याचे भानही कलाकाराला नसते. तो केवळ कलेचा पुजारी असतो, मनोभावे पूजा करतो आणि रसिकांना त्यांचा आस्वाद देऊ करतो. असे असले तरीही रेकॉर्ड्सचे महत्व अलिखित असते, ते राहतेच. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया स्तर बुक ऑफ रेकॉर्ड, जुनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड (कोलकता) ही अशी काही मोठ्ठी रेकॉर्ड्स कवी प्रविंनी केली आहेत. शिवाय वंडर बुक ऑफ रेकॉर्ड (युनायटेड किंग्डम) तर्फे प्रविंना सुवर्ण पदक बहाल केले आहे. अशा हरहुन्नरी कवीच्या काव्यासेवेची दाद मिडिया न घेईल तरच नवल. सर्वांकडून त्यांच्या या यशाची दाद घेतली गेली. सोलापूर आकाशवाणी केंद्रावर प्रविंची दोनदा मुलाखत झाली. अतिशय सुंदर, सहज अशी ती मुलाखत गाजली. तसेच टीव्ही च्यानेल्सवरही अनेकदा त्यांची मुलाखत झालेली आहे. ओघवती भाषा, शब्दांची जाण, रसिकांचा अंदाज, आणि त्या बरोबर उत्तम वक्तृत्व ह्याचा चढता आलेख म्हणजे प्रविंचे एकापेक्षा एक बहारदार कार्यक्रम होय. प्रवि उत्कृष्ट निवेदक देखील आहेत. निवेदनासाठी अभ्यास लागतोच. कविते भोवती रुंजी घालीत केलेले निवेदन अत्यंत प्रभावी असते. भाषा प्रवाही असली की शब्द आपोआप धावत येतात.
तरुणांचा आदर्श, अतुलनीय वक्तृत्व लाभलेले भारतीय आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे श्री. स्वामी विवेकानंद. त्या महान देशभक्ताचे स्मृतीप्रित्यर्थ असलेला विशेष असा एक पुरस्कार प्रविंना प्रदान देण्यात आलेला आहे. हे नक्कीच विशेष आहे.
कविराज उत्तम निवेदकसुद्धा आहेत. ते स्वत:चे कार्यक्रमात निवेदन करत
- वंदना धर्माधिकारी
मुख्यसंपादक