आजही आठवतं मला
तुझं ते चष्म्यातून बघणं
घायाळ व्हायचं हृदय माझं
बघून तुझं,गालातल्या गालात हसणं
तुझं ते स्मित हास्य
वेड लावायचं मला
गालावर पडणारी खळी
शोभून दिसायची तुला
बोटानं तू अलगद चष्मा
अन् गालावरील बट सावरायची
अल्लड तुझ्या या चाळ्यानं
तू स्वर्गाची अप्सरा भासायची
नकळत मन माझं
तुझ्यात गुंतलं
बघ ना गं वेडे
चष्म्यातल्या नजरेनं हे सारं हेरलं
आजही आठवतं मला
गर्दीत तुझं चष्म्यातून चोरुन बघणं
अन् एकांतात बोलतानाही
चेहरा हातातल्या ओंजळीत झाकणं
पहिल्या प्रेमाची
ती सुरुवात होती
तुझ्या माझ्या भेटीसाठी
आतुरलेली नजर हेच सांगत होती
आता झाल्यात,
दोघांच्याही वाटा वेगळ्या
ओठी येणारे ते शब्द अन् भावना
हृदयातच साठवून ठेवल्या सगळ्या
तू दूर जाताच
तुझ्या आठवणींची लागते रांग
कसं सावरु स्वतः ला
तुच आता सांग
माझं,तुझ्यावर प्रेम होतं
हे सांगायचं राहिलं आहे
तुझं ते चष्म्यातून चोरुन बघणं
आठवणीत या,हृदयाचं धडधडणं सुरू आहे…!
संदीप देविदास पगारे,
( नांदूर मधमेश्वर-नाशिक )
मुख्यसंपादक