आज काहीतरी नविन शीर्षक आणि त्याचा अर्थ त्याहूनही वेगळा आहे……
….*
रीना च लग्न होऊन बराच कालावधी झाला होता,खूप थाटामाटात आईवडिलांनी भावांनी लग्न लावलं होत आपल्या लाडक्या ताईच…नवीन स्वप्न , नवीन माणस, नवीन नाती, नवनवीन अपेक्षा….
स्वभाव अगदी गोड, शांत, हसरी घरात सर्वांना समजून घेणं, काळजी घेणे, आपली कर्तव्य पार पाडने….घरी मुलांना क्लासेस घ्यायची ….खूप चांगली गुन, सासू सासरे तसे चांगलेच आणि त्याहूनही चांगले पती,…..
रीना चे पती रोहन …
रोहन: रीना चल लवकर वेळ होईल
रीना: हो आलेच
रोहन आणि रीना हॉस्पिटल ला गेले होते ते अस की रीना ला बाळ होत नव्हतं…त्यासाठी ती ची ट्रीटमेंट चालू होती…
रीना रोहन नेहमीप्रमाणे हॉस्पिटलला जाऊन आले..
रात्री जेवण करता करता तिच्या डोळ्यातून थेंब खाली ओट्यावर पडत होते,..
रोहन : जेवण झालं का
रीना: (डोळे पुसत) हो आलेच
रोहन आणि रीना च जेवण वगैरे झालं आणि रोहन क्रिकेट पाहत बसला होता…आणि ती मॅच संपायला १ तास तरी जाणार होता ….
ते एकमेकांना खूप समजून घ्यायचे…..
रोहन ला सकाळी ऑफिस ला जायचं नव्हतं म्हणून सकाळच्या डब्याची तयारी काही करायची नव्हती ….
मी आहे गॅलरीत म्हणत…..रीना आपल्या गॅलरीत जाऊन बसली होती शांत रात्रीची अबोल शांतता, रस्त्यावरचे दिवे चमकत होते, आभाळाकडे पाहत ती आभाळाशी बोलत होती….काहीतरी संवाद…..साधत होती
” काय हे अस अस्त सगळ,. किती त्रास होतोय याचा मला …
काही अंदाज पणं येत नाही…..”.
किती औषध किती लोकांच्या टोचण्या त्यांची पोटाकडे रोखून पाहणारी नजर, विचित्र असे प्रश्न , किती दवाखाने, किती रिपोर्ट्स, किती ब्लड टेस्ट, काय खायचं काय नाही… पैसे खर्च होतात ते ही वेगळेच, प्रत्येकाचे वेग वेगळ्या उपायांचा सल्ला,..थेरपी, घरा बाहेर निघताना पडलेलं प्रश्न..कोणत्या देवाकडे जा पासून कोणते उपवास…
हे देवा……
परवा शेजारची अलका टोचून च म्हणाली ” काय ग काय गूड न्यूज” अस वाटत होत माझ्या काना खाली मारावी कोणीतरी,
गावी गेलं की तिथे ही शेजारच्या आया बाया …काय ग चांगली बातमी कधी ऐकायला मिळते,.?…
यावर्षी तरी हवीच…
काही बाया तर बारसे , वाढदिवस, आणि देवाच्या कार्यक्रमाला ही बोलवत नाहीत , …
काय चुकतय माज मला आईपण नाही भेटत तर माज काय चुकत….
त्यात माझा पती रोहन आणि घरचे समजूत घेतात म्हणून खूप आधार मिळतो….अस बोलून शांत बसली….
…
ही आहे रीना ची परिस्थिती पणं मला याच्यावर त्या प्रतके स्त्री बद्दल बोलायचं आहे ज्यांना समजून घेणार सुद्धा कोणी नाही..ना सासरचे ना नवरे आणि नाही बाकीचं कोणी… ज्या खरच खूप प्रयत्न करत आहेत एक “जननी” होण्यासाठी गोजिरवाना तिलाही कोणीतरी आवाज देण्यासाठी
शरीरात दोष असेल तर यांचं काय चुकत..काय त्या वाईट व्यक्ती आहे…
स्त्री म्हणजे या सृष्टीतील एक सुंदर देणगी आहे… जीच्याशिवाय हे विश्व च नाही…..
त्यांना नाही वाटत का त्यांना कोणी तरी “आई” म्हणावं, ते गोजिरवाणे हात, पाय, बोट, त्यांना स्पर्श करावेत, गोजिरवाणा आवाज हसताना कानात येत राहावं…
आई होण या जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे ,..हे विश्व आई ला पुजत, आई अंबाबाई, लक्ष्मी, दुर्गा, पार्वती, रुक्मिणी हीची आपण सर्वजण मुल आहोत ना, मग कुणाला बाळ होण न होन हे काही आपल्या हातात आहे का…?
अनियमित मासिक पाळी, पोटात होणाऱ्या वेदना, शरीरातल्या काही घटकांची कमतरता, हार्मोन्स प्रॉब्लेम आणि राहील तरी ते बीज मोठं न होन..नैसर्गिक रित्या गर्भपात होन, ..या सारख्या असंख्य प्रत्येकाच्या शरीरात रचना असतात…
सफरचंद च्या बागेत गेल्यावर एखाद झाड सफरचंद देत नसेल तर आपण त्याला कोसल नाही पाहिजे, टोमणे नाही मारले पाहिजे उलट ते झाड स्वतः आतल्या आत मरत अस्त कुठे तरी स्वतः दोष देत अस्त, त्यात बाहेर च्या जगातले उपदेश आणि हिनवणी,…यानेच ते झाड स्वतः च मरून जात…
हे का अस आहे…? का त्या लोकांना जपल जात नाही ज्यांना ऑलरेडी प्रॉब्लेम्स आहेत, हातांच्या रेशावर आपल नशीब लिहिलं जरी नसेल तर आपल्या स्वबळावर आणि इच्छाशक्तीवर नशीब पणं बदलू शकतो…पणं काही गोष्टी नैसर्गिक असतात आपण त्याला नाही बदलू शकत….जितक आपल्या कडून होऊ शकत तितकच करू शकतो..
अश्यावेळी आपल्या ला यांना उलट जास्त प्रेम दिलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, धीर दिला पाहिजे जगण्याचा नवा उद्देश दिला पाहिजे, नाही की त्याचं त्याच गोष्टीने त्यांना दोष देत राहील पाहिजे..
आई होन जगातलं सुंदर गोष्ट आहे…..
पण माझ्यामते त्याआधी काही बोलायचं असेल तर एक “स्त्री ” होन च खूपच मोठी गोष्ट आहे,….
एका घरात जन्माला येऊन दुसऱ्या घरात घरपण आणण, लहानपना पासून प्रत्येकाची काळजी घेणं, मुलांच्या बरोबरीने चालन, शिक्षण घेणं, घरातली कामं आवरण, आई बाबांना मदत करन, लग्नानंतर ही सर्व जबाबदारी मनापासून स्वीकारणं, त्यांच्या लोकांना संभाळन, आपल अस्तित्व लपवून दुसऱ्या साठी जगणं, आजारी असली तर एक स्त्री घरच काम करू शकते, जाईल तिथे आपली मान मर्यादा सांभाळते, कपडे काय घालावेत कुठून काही विचित्र तर दिसत नाहीय ना, बस असो ट्रेन असो आपली पुरेपूर काळजी घेत राहते कारण कोणीही आपल्याला चुकीचा स्पर्श करू पाहत असेल,..
वयात आल्यावर आलेली मासिक पाळी ला ती दर महिन्याला झेलते त्याच्या असह्य वेदना किती असो , शाळेत, कॉलेज मध्ये किंव्हा जॉब वर तिला जायचं च आहे….घरची कामं करायचीच आहेत,…..
आपल्या मुलांना खाऊ पिऊ घालून त्यांना मुलं होई पर्यंत हे सगळच करायचं आहे…मग एक बाळ पासून मुलगी चा प्रवास, बहीण, भाची, बायको, प्रेयसी, आई, मैत्रीण, नात, पुतणी, आजी ,ऑफिस कर्मचारी, आयपीएस अधिकारी, एक डॉक्टर , नर्स, पोलिस, लेखिका, क्लर्क, शिक्षिका, एक सैनिक, बस कंडेक्टर, सोशल वर्कर, हाऊस वाइफ, रिक्षा चालक, ट्रक चालक, हवाई सुंदरी, अभिनेत्री, माहीत किती तरी सर्कल मधून तिला फिरायच असत आयुष्य संपे पर्यंत….
काही लोक असे पणं असतात शारीरिक उपभोग घेऊन बेवारस मुलांना असे कचऱ्यात, फुटपाथ, आश्रमात, रस्त्यावर, मंदिरात, प्लॅटफॉर्म वर, ठेऊन जातात त्या बाळाचं काय चुकत असेल जे ते आयुष्भर असे तसेच फिरत राहतात…ज्यांना मूल हवं आहे त्यांना नैसर्गिकरीत्या समस्या आहेत आणि ज्यांना हे वरदान आहे ते कधी कधी आपल्या चुका लपविण्यासाठी अस ही करून जातात…
महाराष्ट्राला मिळालेली एक अशी अतुल्य भेट म्हणजे “सिंधुताई सपकाळ” अनाथांची माय जिला बोललं जात,…ज्यांनी आयुष्या त खूप खस्ता खाल्या…अनाथ मुलांना सांभाळ केला आज असंख्य पुरस्कार प्रदान केले आहेत त्या माऊलीला म्हणजे विचार करा आपल्याला एक ४ लोकांचं घर सांभाळता येत नाही तिथे त्या माईकडे काहीही नसता ना इतकं काही मिळवलं की आज ती राहते तिथे पुरस्कार ठेवायला जागा नाहीत….ज्या पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी आहेत…..
तर गरज आहे स्वतःच्या जुन्या रखडलेल्या विचारातून बाहेर पडण्याची…आणि आनंद आणि प्रेम वाटण्याची …
शाळेत जसे उत्तर बरोबर असतील तर प्लस पॉइंट आणि उत्तर चुकीचं असेल मायनस पॉइंट मिळतात तस च आपल्या आयुष्यातली कर्म आहेत चांगली केली तर वर बसलेला देव आपल्या डायरीत प्लस पॉइंट जोडत असतो…आणि चुकीचं वागल तर मायनस पॉइंट मिळतात…तर आपल्यावर डिपेंड आहे की आपण कस वागावं, प्रेम वाटत चला, समजून घेत चला सर्वांना आणि समाधान मिळवत जा…..
हे जग सोडताना प्रेम देऊन जायचं आहे आणि जाताना समाधान घेउन..जायचं आहे
एक स्त्री ला कोणत्याही बाळा बद्दल आपुलकी, आणि प्रेम अस्तच …अशी कोणती स्त्री नाही जिला बाळाचा लळा नाही जिला बाळ नको आहे, जिला बाळा बद्दलच्या भावना नाहीत…जिच्या उदरातून बाळ नसताना ही दुसऱ्या बाळांचा सांभाळ करते ती पणं एक आईच असते….
गर्भातून जन्म देणेच म्हणजे आई नाहीय …जिने जन्म दिला नाही आणि जी प्रतेक नात्याच्या स्थरावर आपल आईपण निभावत असते ती म्हणजे आई असते…त्या मुळे कृपया अश्या आयाना कोणी टोचून , आणि त्यांचं मन दुखावे ल अस कोणी बोलू नका, काय माहित वर देवाच्या डायरीत तुमचे मायनस पॉइंट जमा होत असतील….
रुपाली स्वप्नील शिंदे
आजरा
मुख्यसंपादक
Yekdm khar aahe ani khup chan likhan 👌👌