दंगल

लोकांनी दंगल घडवली जाती धर्मात
रक्तरंजीत, कर्णकर्कश आणि धडाम’धूम
मला पण दंगल घडवायची आहे शब्दा शब्दांत
अहिंसक, आंदोलक आणि शांततेत

लोकांनी दंगल घडवली गल्ली-चौकामधे
लाठ्या, काठ्या अन् दगड घेऊन
मला पण दंगल घडवायची आहे गाव वस्ती शाळांमध्ये
पण हातात पाटी, पुस्तक अन् कलम घेऊन

लोकांनी दंगल घडवली घराघरात
भगव्या, हिरव्या, निळ्या आशा अनेक रंगात
मला पण दंगल घडवायची आहे मनामनांत
सामाजिक आर्थिक आणि वैचारिक रंगात

लोकांनी दंगल घडवली माणसा-माणसांत
उच्च नीचतेच्या भावनांतून
मला पण दंगल घडवायची माणसांतच
पण, समानतेच्या तत्वातून

मला पण व्हायचं दंगलकार
त्या नितीन चंदनशीवे सारखा
त्याने कांबळे घडवला
नुसताच “ऊं” म्हणत कण्हत असणार
योग्या तूला पण कांबळे घडवायचा आहे
हातात क्रांतीची मशाल घेऊन
समाज परिवर्तन करणार

    - योगेश पानपाटील
                              

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular