हरपली संवेदना,माणुसकी दुरावली
जन्म माणसाचा तरी,जनावरं कशी झाली.
जनावर तरी बरी, घात न करी कुळाचा
किती झाले बलात्कार,सांग तू कोण्या जातीचा.
म्हणे माणूस स्वतःला,सांग माणुसकीचे गुण
भ्रष्टाचार करून तू,दाखवतोस अवगुण.
चोर लुटेरे माणसचं ना,माणूस अन्याय अत्याचारी
मुलगी नको म्हणून,सांगा गर्भपात कोण करी.
असतील चांगली माणसं, बोटावर मोजण्याएवढी
तुम्हीच सांगा वाचकांनो,माणुसकी शिल्लक केवढी.
गरजूंच्या मदतीला,सांगा तुम्ही किती जाता
दुरावलेली माणुसकी,जवळ येईल का आता.
माणूस मनाने दुरावला होता,आता शरीरानेही दुरावला
या संकटातून तरी शिक,यामुळे तर कोरोना आला.
- कवी किसन आटोळे
( वाहिरा तालुका आष्टी )
मुख्यसंपादक