तू देव ना रे आमुचा…
तुला तर आम्ही माय-बाप मानतो…
मग भेदाभेद लेकरात तुझ्या
असा बरं का तो…?
साफ करायला, सजवायला हात आमुचा चालतो..
मग सांग ना रे देवा…
पुजायला स्पर्श आमचा का तुला छळतो…
‘देव’ म्हणजे माया ममता,निर्मळता कृपासागर तो…
तरीही आमच्या देवा तुला राग आमुचा येतो…?
कधी ते विशिष्ट आमच्यापेक्षा श्रेष्ठ नाही का रे चुकत
पण मग चुकीचा शाप आमच्याच माथी मोफत…
श्रद्धेने प्रामाणिक वृत्तीने केलेले बदल तुला आवडत नाहीत का..?
मग हीन वृत्तीने केलेल्या कृतीला तू अडवत नाही का…?
तुझ्या रागाच्या भीतीखाली अनेक पिढ्या आल्या गेल्या
पण मग बिनबोभाट चुकीच्या पंगती अनितीत उठल्या…
जे झिजतात तुझ्यासाठी
त्यांचाच तुला राग येतो का..?
की आमच्या भोळ्या भक्तीचा व्यवहार करतात त्यांचा ही येतो..
कळत नाही देवा, मनातली गुंतागुंत सोडवायची कशी…
भोळ्या भाबड्या भक्तीतली भीती घालवायची कशी…?
तूच आता बुद्धी दे रागाला सोडून…
विनंती ही दयासागरा तुला हात जोडून…!🙏🏻
लेखक- राजन सुर्वे
रुण गाव, ( पराडकर वाडी )
तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी.
समन्वयक – पालघर जिल्हा