खरं तर आज कालचा जमानाच वेगळा असे म्हटले जाते.माणूस खुप पुढे गेला किंवा माणसा मध्ये सुधारणा झाली असे सर्व जण म्हणतात.आजच विज्ञान खुप पुढे गेलं हे ही मी मानतो.पण आजुबाजुला जरा बारीक लक्ष दिला तर आपण कोठे आहोत खऱ्या अर्थाने आपला समाज कोठे आहे याचाही विचार करायला हवा.
आपण देवाला नैवेद्य ठेवतो.खरं तर देवाला नैवेद्य दाखवला की तो नैवेद्य कोठे तरी बाहेर ठेवायचा की आपला विषय संपला.आपल्याला अन्न मिळत.आपण त्यासाठी कष्ट ही करतो.आणि मिळालेल अन्न हे प्रत्येक देवाच्या नावाने पाच-दहा नैवेद्य असेच वाया घालवतो.पण तो नैवेद्य जर का कुठल्या तरी पक्षाने किंवा प्राण्याने खाला तर ठिक आहे.नाही तर वाया गेला तर काय उपयोग त्या नैवेद्याचा.
एखादं लहान मुल जे भिक मागुन खात.अशा मुलान जर आम्ही देवा जवळ ठेवलेला नैवेद्य खाला तरी देव काय रागवतो का..,चिडतो का..,भांडतो नाही.अशा लोकांना देव आपल्या मार्फत देतो.पण मनुष्याला हे कळत नाही… खरं तर सिंधुताई सपकाळ ह्यांनी तर स्मशानातील नैवेद्य खाऊन दिवस काढले होते.
खरं तर देवाला बसल्या जागी नैवेद्य मिळतो.पण माणसांच्या बाजारात राहून हि भिकारी किंवा गरीब हा उपाशी पोटी राहतो…
देवा तुला जे कळत ते माणसाला कळत नाही.माणसातल्या माणसाला माणूसकीच मिळत नाही.
- आदर्श भिमदिप हळवणकर
रा.हरपवडे ता.आजरा
मुख्यसंपादक