नाच रे मोरा” या बालगीताच्या मुळ रचनाकारांची माफी मागून….
😀विडंबन रचना😀
नाच रे पोरा,मित्राच्या लग्नात,
नाच रे पोरा नाच..
छान छान मांडव सजला रे,
डिजेचा ठोका वाजला रे..
जोश घे अंगात, ये थोडा रंगात,
नागीण होऊन नाच....
नाच रे पोरा, मित्राच्या लग्नात,
नाच रे पोरा नाच
गोरी गोरी छोरी बघती रे,
गालातल्या गालात हसती रे...
निघाली वरात,नाच तू जोरात,
दुखली जरी रे टाच....
नाच रे पोरा, मित्राच्या लग्नात,
नाच रे पोरा नाच
बाजूची पोरगी पटली रे,.
तिची एक बांगडी फुटली रे....
बघ जरा खाली,तुझ्या पायाखाली,
पायात घुसेल काच....
नाच रे पोरा, मित्राच्या लग्नात,
नाच रे पोरा नाच
✍️ – श्री.विजय शिंदे….
३२ शिराळा, (सांगली.)
मुख्यसंपादक