‘नातं तुझं नि माझं’
काय वर्णावं माय लेकराचं नातं
जाता चिमुकलं नजरेआड ती सैरावैरा धावे….
घाली देवाला रोज साकडं
माझ्या तान्ह्याला दिर्घायुष्य लाभावे….
पण अचानक चूकतो
जन्माचा फेरा…..
जातो काळजाचा तूकडा
काळाच्या पडद्याआड
पोटात उठती असंख्य ज्वाला
फिरती माय सैरावैरा….
नयनातून वाही अश्रूंचे पाट..
हंबरतं,गहिवरतं,बेभान
होवून धाय मोकलून
फोडतं काळीज हंबरडा
कायम त्याच्या आठवनींच्या
पावसात भिजत जातं….
- सौ.भाग्यश्री शिंदे (मोरे) आपेगांवकर
ता.अंबेजोगाई
जि.बीड
मुख्यसंपादक