माफ कर देवा
एक गुन्हा मी करतो
खून भुकेचा करण्या
मी निवद तुझा चोरतो
तुझ्या विना कोणी रे
नाही माझं जगात
रोजची उपासमार
आली बालवयात
आहे रे तू
भावाचा भुकेला
जाण ही थोडी
येऊ दे माणसाला
दुनिया ही सारी आज
बालमजूर म्हणून छळते
पोटातली आग ही
रोजच पेटते
दगडाच्या देवाला
रोज निवद मिळतो
अन् माणसातला देव मात्र
उपाशीच मरतो..!
- संदीप देविदास पगारे
खानगाव थडी,नांदूर मधमेश्वर-नाशिक
मुख्यसंपादक
[…] निवद […]