Homeवैशिष्ट्येपरकीय निधी नियंत्रण अधिनियम , २०१० - नेहमी विचारले जाणारे प्रश्न-

परकीय निधी नियंत्रण अधिनियम , २०१० – नेहमी विचारले जाणारे प्रश्न-

भाग २४
परकीय निधी नियंत्रण अधिनियम, २०१०नेहमी विचारले जाणारे प्रश्न-
परकीय मदत (नियंत्रण) अधिनियम, १९७६

▶️ प्र. १) परकीय गुंतवणूक/मदत म्हणजे काय?
उ. परकीय गुंतवणूक/मदत म्हणजे परदेशी स्त्रोतांकडून खालील गोष्टी देणगी, हस्तांतरण अथवा इतर रुपात मिळते.
१) कोणतीही वस्तू मात्र ती एखाद्या व्यक्तीस खाजगी वापरासाठी अथवा बक्षीस म्हणून दिली असल्यास तिची किंमत १०००/- रुपयांपेक्षा जास्त नसावी.
२) परकीय किंवा भारतीय चलन
३) परकीय रोखे.
▶️ प्र. २) परकीय स्त्रोत काय अथवा कोण?
उ. परकीय स्त्रोतात खालील गोष्टींचा समावेश होतो.
१) कोणत्याही परकीय राष्ट्राचे वा प्रदेशाचे सरकार आणि सरकारची कोणतीही संस्था
२) जागतिक संस्था
३) परकीय संस्था
४) परकीय नागरिक
संयुक्त राष्ट्र किंवा त्यांची संस्था, जागतिक बँक आणि इतर काही जागतिक संस्था परकीय स्त्रोताच्या व्याख्येतून वगळल्या आहेत.
▶️ प्र. ३) परकीय देशात राहणाऱ्या भारतीयांकडून (NRI) मिळालेली देणगी परकीय मदत असते का?
उ. परकीय देशात राहणाऱ्या भारतीयाने स्वतःच्या शिलकीतून सामान्य बँकिंग सुविधामार्फत मदत पुरविल्यास ती रक्कम परकीय मदत धरली जात नाही. मात्र अशा व्यक्तींकडून देणगी स्वीकारताना त्यांच्याकडे भारतीय पारपत्र असल्याची खात्री करून घेणे तसेच सदर पारपत्राची तपशीलवार माहिती घेणे महत्वाचे आहे.
▶️ प्र. ४) भारतीय मूळ असल्याचे ओळखपत्र धारक अथवा भारतीय मूळ असलेली व विदेशी पारपत्रधारक व्यक्ती अथवा भारताचे नागरिकत्व मिळवलेली परदेशी व व्यक्ती यांच्याकडून देणगी घेतल्यास ती परकीय स्त्रोत समजली जाते का?
उ. हो. कारण वरील सर्व व्यक्ती विदेशी नागरिक आहेत तसेच नागरिकत्वाचा पुरावा म्हणून त्यांच्याकडून स्वतःच्या देशाचे पारपत्र असते.
▶️ प्र. ५) अधिमंडळाचे सभासद अथवा विश्वस्त म्हणून परदेशी व्यक्तींना नियुक्त करता येते का?
उ. गृहखाते परदेशी व्यक्तींना न्यास अथवा संस्थेच्या कार्यकारी समितीचा सभासद किंवा विश्वस्त म्हणून नियुक्त करण्यास कोणाला प्रवृत्त करत नाही. मात्र खालील अटींची पूर्तता झाल्यास केंद्र सरकारची सरकारची पूर्वपरवानगी घेऊन परदेशी व्यक्तीस विश्वस्त अथवा कार्यकारी समितीचा सभासद म्हणून नियुक्त करता येते.
१) सदर व्यक्तीचे लग्न भारतीय नागरिकांशी झाले असले पाहिजे.
२) सदर परदेशी व्यक्ती कमीतकमी ५ वर्षे भारतात राहते व काम करते आहे.
३) सदर परदेशी व्यक्तीने भूतकाळात स्वच्छेने स्वतःचे वैदकीय अथवा आरोग्यविषयक अथवा इतर कोणत्याही. विशिष्ट प्रकारचे ज्ञान भारताने उपलब्ध करून दिले असले पाहिजे.
४) सरकारी कराराच्या तरतुदीनुसार सदर परदेशी व्यक्ती न्यासेच्या अधिमंडळाची अथवा कार्यकारी समितीची सभासद असावी.
५) सदर परदेशी व्यक्ती न्यासाच्या अधिमंडळाची अथवा कार्यकारी समितीची तसेच बहुउद्देशीय मंडळ/ संस्थने प्रतिनिधित्व करणारी पदसिद्ध सभासद असावी. असे मंडळ/ संस्था अपरकिय स्त्रोताच्या व्याख्येत येणाऱ्या नसाव्यात. मात्र सदर व्यक्तीच्या नियुक्तीचे योग्य समर्थन असणे आवश्यक आहे.
▶️ प्र. ६) परकीय मदत कोण स्वीकारू शकते?
उ. ज्या स्वयंसेवी संस्थेकडे निश्चित असे सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक अथवा सामाजिक प्रकल्प राबविण्यासाठी तयार आहेत अशी स्वयंसेवी संस्था केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगी नंतर अथवा केंद्र सरकारकडे नोंदणीकृत झाल्यानंतर परकीय मदत स्वीकारू शकते.
▶️ प्र. ७) परकीय मदत स्वीकारण्यासाठी कोण प्रतिबंधीत आहे?
उ. खालील व्यक्ती अथवा संस्था परकीय मदत स्वीकारू शकत नाहीत.
१) निवडणुकीस उभा राहिलेला उमेदवार.
२) नोंदणीकृत वृत्तपत्राचा बातमीदार, स्तंभलेखक, व्यंगचित्रकार, संपादक, मालक, प्रकाशक, मुद्रक इत्यादि.
३) न्यायाधीश, सरकारी नोकरी, नगरपालिका कर्मचारी.
४) विधिमंडळाचा सभासद
५) राजकीय पक्ष अथवा पक्षाचा पदाधिकारी.
६) परकीय गुंतवणूक (नियंत्रण) अधिनियमाच्या कलम १० (अ) अन्यवे परकीय मदत घेण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेल्या व्यक्ती अथवा संस्था.
▶️ प्र. ८) परकीय मदतीवर मिळालेले व्याजदेखील परकीय मदत समजले जाते का?
उ. हो
▶️ प्र. ९) परकीय मदत एकापेक्षा जास्त बँक खात्यांमध्ये स्वीकारता आणि त्यातून वापरता येते का?
उ. परकीय मदत नोंदणीसूचनेत उल्लेख केलेल्या अथवा गृहखात्याची पूर्व परवानगी मिळालेल्या एकाच खात्यामार्फत स्वीकारता अथवा वापरता येते. सदर खात्याचा व संस्थेने नोंदणी अथवा पूर्वपरवानगीकरिता केलेल्या अर्जात उल्लेख केलेल्या खात्याचा क्रमांक एकच असणे आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त खात्यांच्या वापरावर कायद्याने प्रतिबंद आहे.
▶️ प्र. १०) परकीय मदत व स्थानिक मिळकत एकत्र केली जाऊ शकते का?
उ. नाही, संस्थेच्या स्थानिक निधीबरोबर परकीय मदत एकत्र केली जाऊ शकत नाही.
▶️ प्र. ११) परकीय मदत भारतीय रुपयांमध्ये मिळू शकते का?
उ. हो, परकीय स्त्रोताकडून कायदेशीररित्या मिळालेली भारतीय रुपयांमध्ये अथवा विदेशी चलनातील कोणतीही परकीय मदत समजली जाते. त्यामुळे रुपयांमध्ये असली तरी अशी देवाणघेवाण परकीय मदत समजली जाते.
▶️ प्र. १२) सदर देवाणघेवाणीसाठी अधिकृत खाते बदलण्याची कार्यपद्धती कोणती?
उ. अधिकृत खाते बदलण्यासाठी अर्ज जुन्या व नवीन खात्याच्या तपशीलवार माहिती आणि अधिकृत खाते बदलण्याचे कारण यांसह गृहखात्याकडे करणे आवश्यक आहे. सदर अर्जासोबत विश्वस्त अथवा कार्यकारी समितीच्या ठरावाची प्रत जोडणे आवश्यक आहे. गृहखात्याची मंजुरी मिळाल्यावरच नवीन खाते सुरु होते.
▶️ प्र. १३) नोंदणीसाठी कोणत्या पात्रता अटीच्या पूर्तता करावी लागते.
उ. संस्थेच्या सुरुवातीच्या दिवसात संस्था नोंदणीसाठी पात्र नसते. अशावेळी संस्था पूर्वपरवानगीसाठी अर्ज करू शकते. नोंदणीसाठी संस्थेस खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक असते.
१) संस्था न्यास अधिनियमाखाली अथवा संस्था नोंदणी अधिनियमाखाली अथवा कंपनी अधिनियमाच्या कलम २५ खाली नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
२) संस्था कमीतकमी ३ वर्षे अस्तित्वात असली पाहिजे आणि संस्थेने स्वतःच्या प्रमुख उद्धीष्टांच्या पूर्तीसाठी व्यवस्थापन खर्च वगळता सदर ३ वर्षात कमीतकमी रु.६,००,०००/- (सहा लाख रुपये) खर्च केले असले पाहिजे. नोंदणीसाठी अर्ज करताना संस्थेच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना देण्यासाठी मागील ३ वर्षाचे सनदी लेखापालाकडून (C.A) लेखापरीक्षण करून घेतलेले आय-व्यय पत्रक जोडणे आवश्यक आहे.••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular