Homeमुक्त- व्यासपीठपरतुनी या ना राजं !!

परतुनी या ना राजं !!

राजं बघताय ना !
तुम्ही स्थापित केलेले हे स्वराज्य
तुम्ही दिलेले माय लेकींना स्वातंत्र्य
तुम्ही दिलेले सर्वांना समान हक्क
तुम्ही सुरक्षिततेचे दिलेले वचन
आज कसं पायदळी तुडवलं जातंय सर्व
आपलीच मुलगी आपल्या समाजात आता सुरक्षित राहिली नाही
दडपणात जगती आहे “ती” आज प्रत्येक स्त्री

या गनिमांचा कडेलोट करण्यासाठी परतुनी या ना राजं !!
परतुनी या ना राजं !!

आज सगळेच फितूर झालेत राजं
नातेगोत्याचे भान हरवून बसलेत
स्वतःच स्वतःला ओळखायला कमी पडलेत
फक्त पैशांपुढे नतमस्तक होत आहेत
आई वडीलांच्या त्यागाची अवहेलना सुरु आहे
भ्रष्टाचाराचा नुसता सुळसुळाट सुटला आहे
समाजकल्याणाच्या नावाखाली राजकारण चालू आहे

या गनिमांचा कडेलोट करण्यासाठी परतुनी या ना राजं !!
परतुनी या ना राज !!

गरिबांचे रोज हाल होत आहेत
सगळे भावनांशून्य झाले आहेत
लोकशाहीत हुकूमशाही चालू आहे
स्वातंत्र्यातही जनता पारतंत्र्यात जगत आहे
संस्कारांचे धडे नाही
इथे व्यसनाधिता वाढत आहे
सत्तेसाठी सामान्यांना डावलले जात आहे

या गनिमांचा कडेलोट करण्यासाठी परतुनी या ना राजं !!
परतुनी या ना राज !!

नाही ना बघवत राजं आता गड किल्ल्यांची ही व्यथा
तुम्ही केलेल्या पराक्रमाचा विसरच पडला आहे काहींना
गडावर येऊन धिंगाणा करताना शरमही वाटत नाही यांना
डोळे मिटून पाहत असाल ना राजं तुम्ही उघडा नाच त्यांचा
हत्तीच्या पायदळी द्यावे कि चाबकाचे फटके द्यावे
असच वाटत असेल ना राज तुम्हाला क्षणाक्षणाला

या गनिमांचा कडेलोट करण्यासाठी परतुनी या ना राजं !!
परतुनी या ना राजं!!

हर एक मावळा जगण्यासाठी नव्हे तर मरणासाठी लढला
स्वराज्यासाठी देह त्याग करण्यास नाही मुकला
रक्ताचा थेंबन् थेंब स्वराज्यासाठी वाहिला
मोडला पण गणिमांसमोर नाही वाकला
आजच्या तरुणांना पुन्हा स्व:कर्तृवाची जाणीव करून देण्यासाठी आणि

या गनिमांचा कडेलोट करण्यासाठी परतुनी या ना राजं !!
परतुनी या ना राजं !!

कवयित्री – नेहा नितीन संखे
( बोईसर )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular