Homeमुक्त- व्यासपीठपावसाचा आनंद

पावसाचा आनंद

खूप दिवस दडून बसलेला पाऊस
आज एकदाचा कोसळला
नद्या, नाळे, वहाल दुधडी
भरुन वाहायला लागल्या

नेमका रविवार सुट्टीचा दिवस असताना
मित्रांना एक एक फोन फिरवला
घनदाट जंगलामध्ये विरारच्या
डोंगरावर जाण्याचा बेत मी आखला

घरातून निघताना छत्री घेऊन जावा
असा आग्रह अर्धांगनीने केला
एक दिवस पावसाचा आनंद
भिजत घ्यावा बोलून मी घर सोडला

अरुण, रोहीत माझे मित्र
एकत्र भेटलो डोंगराच्या पायथ्याला
थांबा रे जरा समोरून गरमा गरम
भजी आपल्याला घेतो खायला

डोंगर चडताना पाय घसरत होते
पावसाने थोडा जास्तच जोर केला
एकमेकांचे हात धरून एकदाचे पोहोचलो
आणि एका कातळावर विसावा घेतला

पाण्याचे झुळझुळ पाट वाहत होते
हिरव्या गवतानी चादर पसरलेली
पक्षांचा चिवचिवाट, वाऱ्याची झुळूक
आनंदाला सीमा नव्हती उरलेली

आजूबाजूचा नयनरम्य परिसर
डोळयात साठऊन घेत होतो
थोड्या क्षणासाठी गावच्या
आठवणीत हरवलो होतो

मौज, मजा,मस्ती , फोटोशूट
खूप केली तिघांनी
परतीचा प्रवास सुरु झाला
आज आनंद दिला पावसानी

कवी: स्वप्नील चंद्रकांत जांभळे
विरार.
मो.९६१९७७४६५६

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular