प्रसंग 1
हे 26 जानेवारी /15 अॉगस्ट असेच विकेंडला जोडूनच यायला पाहिजेत. म्हणजे कसे मस्तपैकी ट्रिपला जाता येते राव! दोन मित्रांमधला संवाद
प्रसंग 2
अरे उद्या सुट्टी आहे आणि ड्राय डे पण आहे. आजच स्टॉक करायला हवाय. बघ बाबा कुठे बसायचं ते.
प्रसंग 3
“राणेबाई, काय मस्त साडी आहे हो! रिपब्लिक डे स्पेशल वाटतं!”
“हो ना अग झेंडावंदनाला यायचं होतं ना! यांना म्हटलच मला पण त्या काळे बाईंपेक्षा जास्त चांगली साडी हवी आहे म्हणून. कित्ती शोधून आणलीय माहितीये ही पांढरी साडी!”
प्रसंग 4
सोसायटीमधल्या सर्व सभासदांना विनंती आहे की कृपया झेंडावंदनासाठी जमावे.
चार वेळा सेक्रेटरींनी घोषणा केल्यावर 500 जणांच्या सोसायटीतून इनमिन 10 माणसे हजर झाली. नंतरच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला आणि अल्पोपहाराला मात्र उत्तम प्रतिसाद मिळाला!
प्रसंग 5
सगळ्या दुकानांमध्ये प्रजासत्ताकदिनानामित्त मोठ्या प्रमाणात सेल लागलेत. लोकांची प्रचंड गर्दी झाली. खूप चेंगराचेंगरी झाली.
प्रसंग 6
एका रिअॅलिटी शोमध्ये अनेक देशभक्तीपर गाणी सादर करण्यात आली. त्यातल्याच एका गायकाला प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व मात्र सांगता आले नाही
प्रसंग 7
“ताई घ्या ना हो झेंडा.
2 रुपयाला एक नि पाचला तीन.
“कमले किती जमले ग?”
“शंभर आणि तुझ्याकडे रे?”
“एकशे आणि वीस!
कमले असे झेंडावंदन दर महिन्याला करायला पाहिजेत नाय. मग काय आपली मज्जा शाळेची फी पण भरता येईल. “
प्रसंग 8
“अवं, ह्ये परजासत्त्याक का काय त्ये लई चांगलं असतय का?”
” आता मला काय ठाऊक?
त्ये प्रजासत्तयाक आपल्याला पोटाला देणार हाय का दोन येळेस? जाऊ द्ये झालं आपण बरं नि आपली मोलमजुरी बरी. चल बेगीनं कामं हाईत बरीच!”
प्रसंग 9
मुलांनो आपण प्रजासत्ताक दिनी आणि स्वातत्र्यदिनीच स्वतंत्र भारताचे देशाभिमानी नागरिक नसतो. तर रोजच, अगदी तुमच्या भाषेत सांगायचं तर 247365 आपण भारताचे नागरिक आहोत आणि भारतीय असण्याचा आपल्याला अभिमान आहे हे नुसतं तोंडाने न सांगता आपल्या वागणूकीतून ते दाखवून द्या.
एक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या भाषणातून दिलेला संदेश.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
- डॉ. समिधा गांधी
मुख्यसंपादक
[…] प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीचे काही कड… […]
प्रसंग ९ खरे आहे हे
पण आजच्या पाल्यांना आणि पालकांना कितपत उमजलं आहे हे……..
कडू आहे पण सत्य आहे आपल्या समाजातील लोकांची मानसिकता समजणे अशक्य आहे
[…] प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीचे काही कड… […]
[…] प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीचे काही कड… […]